वणी पब्लीक स्कुल येथे शासकिय अभियानांतर्गत “एक पेड माँ के नाम” कार्यक्रम उत्साहात संपन्न
वणी श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था, वणी द्वारा संचालित, वणी पब्लीक स्कुल येथे शासकीय अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले.”एक पेड माँ के नाम “या अभियानांतर्गत शाळेच्या परीसरात वृक्षारोपण करण्यात आले.मुलांनी आईचे नावाने आपापल्या घरी झाडे लावली.याप्रसंगी आयोजीत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून श्री.जयवंतराव सोनटक्के उपमुख्याधिकारी, नगरपरिषद,वणी.हे होते.प्रमुख अतिथी म्हणून श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे सन्माननीय सदस्य श्री.विक्रांत चचडा सर उपस्थित होते. अतिथी म्हणुन औद्योगिक प्रशिक्षण केंद्रचे प्राचार्य श्री. अतुल राजगडकर सर, तसेच राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.अभय पारखी सर तसेच समारोहाच्या अध्यक्षस्थानी वणी पब्लिक स्कूलचे प्राचार्य मा. श्री.राकेशजी देशपांडे सर प्रामुख्याने उपस्थित होते. आई आणि वृक्ष हे दोघेही आपाल्याला भरभरून देतात,यांच्यामुळेच जीवन समृद्ध, सुंदर होते.असे प्रतिपादन कवि, साहित्यिक उपमुख्याधिकारी नगरपरिषद वणी श्री जयंतराव सोनटक्के सरानी भाषणातून व्यक्त केले असून आज झाडे लावली व जगवणे हि काळाची गरज आहे असेही अधोरेखित केले.यानंतर अध्यक्षीय भाषणात प्राचार्य मा. राकेशजी देशपांडे सरानी भाषणातून शासकीय अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या सहशालेय उपक्रमांची माहिती दिली आणि एक पेड माँ के नाम, या विषयावर अधिक माहिती दिली.कु.ओजस्वीनी तेलतुंबडे या विद्यार्थीनीनेसुद्धा वृक्षारोपनाचे महत्व यावर भाषण दिले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.एकता गौरकार यांनी तर सूत्रसंचालन सौ.प्रणोती खडसे यांनी व आभारप्रदर्शन कु.अंकीता गोखरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारयांनी अथक परिश्रम घेतले.