राजस्थान च्या कंपनी कडून चंद्रपूर सह विदर्भातील तीन जिल्ह्याच्या तरुण बेरीजगारांची फसवणूक झालेल्या तरुण बेरोजगारांना न्याय मिळवून देणार
मनसे जिल्हाध्यक्ष चंद्रपुर पोलीस अधिक्षक यांना निवेदन देऊन मांगणी
चंद्रपुर : येथे मागील दोन वर्षांपासून शहराच्या बाबुपेठ मराठा चौकात राजस्थानची कंपनी ट्रेंडस्टिक वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड द्वारे शेकडो तरुण बेरोजगार यांना नोकरी मिळण्याची शास्वती देऊन आणि कापड्यांची मार्केटिंग करून लाखो रुपयाची कमाई होईल असे स्वप्न दाखवून फसवणूक केली जातं होती,
प्रत्येक तरुण बेरोजगार यांच्याकडून 11 हजार तें 46 हजार रुपये घ्यायचे आणि त्या बदल्यात निकृष्ठ दर्जाचे कापडी ड्रेस देऊन त्याची मार्केटिंग करायला लावायचे दरम्यान या कंपनीच्या राजस्थान मधील संचालकांनी आपला गाशा गुंडाळला असतांना पैशाची आवक बघता काही परप्रांतीय लोकांनी स्थानिक काहीं तरुणांना पकडून पुन्हा तिथेच डेली ग्रोथ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या नावाची कंपनी काही लोकांनी सुरु केली आणि पुन्हा गरीब तरुण बेरोजगार यांना नोकरीच्या नावाखाली लूट सुरु ठेवली, या कंपनीत वणी येथील रहिवाशी असलेल्या तीन मुली व एक मुलगा यांची सुद्धा फसवणूक करण्यात आल्याने त्यानी मनसे कार्यालयात संपर्क साधला आणि आपली व्यथा सांगितली जी अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे.
जेवढे कपडे विकल्या जातील किंव्हा जेवढे लोकं कंपनीसोबत जो जोडेल त्याला कमिशन बनेल परंतु बाहेर जिल्ह्यातील गावातून आलेल्या तरुणांना स्थानिक चंद्रपूर येथे अगोदरचं मोठमोठी कापड्यांची दुकाने असताना बाहेर प्रांतातून आलेल्या कम्पनी चे कपडे कोण घेणार म्हणून अनेक तरुण बेरोजगार हे अर्ध्यातूनच काम सोडून आपल्या गावी गेले.
मात्र त्यांचे प्रत्येकी 11 हजार तें 46 हजार रुपये कंपनी ने बुडाविले आहें. कंपनीत पैसे भरण्यासाठी काही तरुण मुलं मुली यांनी आई वडिलांना पैसे मागितले त्यात कुणी स्वतःचे मंगळसूत्र विकून पैसे दिले तर कुणी स्वतःची दुचाकी विकून मुलींसाठी पैसे दिले आज तें सर्व पैसे कंपनीने बुडविले असल्याने तरुण बेरोजगारावर आत्महत्त्या करण्याची वेळ आली आहें.
त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडे आम्ही पाठपुरावा करत आहो अशी प्रतिक्रिया मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी दिली आहें. यावेळी पिडीत तरुण बेरोजगार मुलं मुली उपस्थित होते.