एंजल एकॅडमी व आत्मनिर्भर सामाजिक विकास संस्थेच्या वतिने वणीत गरजु होतकरू महीलांची भव्य रोजगाराभिमुख मोफत कार्यशाळा

3

एंजल एकॅडमी व आत्मनिर्भर सामाजिक विकास संस्थेच्या वतिने वणीत गरजु होतकरू महीलांची भव्य रोजगाराभिमुख मोफत कार्यशाळा



प्रशिक्षीत मुलींचा सत्कार समारंभ संपन्र


वणी(यवतमाळ) येथील सुपरिचित एंजल एकॅडमी व आत्मनिर्भर सामाजिक विकास संस्थेच्या वतीने ‌नुकतेच शहरातील एस.बी.मेमोरियल हॉल मध्ये गरजु,होतकरु व विठ्ठलवाडी दत्तनगर स्थित एंजल एकॅडमी मध्ये ब्युटी पार्लर,शिवणकाम व अन्य प्रकारचे रोजगाराभिमुख मोफत प्रशिक्षण घेतलेल्या शेकडो मुलींना सर्टीफिकेट,मोमेंटाे देऊन उत्कृष्ठ प्रशीक्षिनार्थींचा सत्कार कार्यक्रम व कार्यशाळा भरगच्च उपस्थीतीत उत्साहात संपन्न झाला. एंजल एकॅडमीच्या संचालीका व आत्मनिर्भर सामाजिक विकास संस्थेच्या उपाध्यक्षा नमिता पाटील यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणुन समाजसेवीका तथा माजी नगरसेविका पौर्णीमा शिरभाते,समाजसेवीका तथा एकविरा महीला पतसंस्थेच्या अध्यक्षा किरण देरकर,पोलीस उपनिरीक्षक अश्विनी रायबोले,हेअर आर्टीस्ट डॅनी सर नागपूर,सिलेब्रेटी मेकअप आर्टीस्ट शबाना मोटलानी,नागपूर,हेअर आर्टीस्ट दिव्या घोडसे(मुंबई),संस्थेची अध्यक्षा प्रीती पाटील,नागपूर हे मान्यवर विशेषत्वाने उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना ऐंजल अकादमी वणीच्या संचालीका तथा संस्थेच्या उपध्यक्षा नमिता पाटील यांनी केली तर संचालन पत्रकार सागर मुने यांनी केले व आभार प्रदर्शन समाजसेवीका सुचिता पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here