घुग्घूस शहरातील एका बंद घरात 119 विविध जाती धर्माचे मतदार कसे ?

55

घुग्घूस शहरातील एका बंद घरात 119 विविध जाती धर्माचे मतदार कसे ?



ग्रामीण भागातही मतदार यादीत प्रचंड घोळ व वोट चोरीचा प्रकार उघड ?


घुग्घूस : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे आश्चर्यकारक निकाला नंतर महाराष्ट्रातील तसेच देशातील जनतेचे EVM व निवडणूक आयोग यांच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण झालेला आहे. देशाचे लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदार यादीचे सहा महिणे अभ्यास केल्या नंतर पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाला निवडणुकीत विजयी करण्यासाठी मदत करीत असून वोट चोरीचा आरोप प्रत्यक्ष पुराव्यासह देशाला दाखवून दिले आहेत. राहुल गांधी यांच्या भंडा फोड नंतर घुग्घूस काँग्रेस शहर अध्यक्ष व काँग्रेस नेते यांनी घुग्घुस शहरातील तसेच ग्रामीण भागातील मतदार यादी तपासणी केली असता अनेक त्रुटी अनेक भोंगळ कारभार त्यांच्या निरदर्शनास आले आहेत.
घुग्घूस शहरातील केमिकल वॉर्डातील सध्या स्तिथीत बंद असलेले घर क्रं 350 है सचिन बांदूरकर यांच्या मालकीचे असून या घरात विविध जाती धर्माचे आडनावाचे जवळपास 119 मतदार राहत असल्याचे मतदार यादीतून दिसून आले या घटनेची सत्यता तपासण्या करीता काँग्रेस पदाधिकारी त्याघरात गेले असता तो घर बंद अवस्थेत असून त्याठिकाणी कुणीच राहत नसल्याचे उघड झाले.
शहरातील संपूर्ण मतदार यादीत भोंगळ कारभार आहेत शून्य क्रमाकांचे अनेक घर शहरात असून 100 क्रमांकाच्या ही अनेक मतदार राहत असल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे.
चंद्रपूर विधानसभेतील पिपरी हे अंत्यन्त छोटेसे गाव असून या गावातील मतदार यादीत जवळपास 100 मतदार हे एकाच घरात राहत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे.
घुग्घूस शहरात सध्या देशातील अनेक राज्यातील लोक वास्तव्यास आलेले आहेत. जर मतदार यादीत नागरिकांचा पता एकाच घराचा दाखविला जात असेल तर मतदारांची ओळख कशी पटवायची मतदार यादी निर्माण करने त्यांची तपासणी करने व ती जाहीर करने हे निवडणूक आयोगाचे प्रमुख कार्य असतांना इतका मोठा भोंगळ कारभार कसा होऊ शकतो हा मु‌द्दाम केलेला प्रकार असून चंद्रपूर विधानसभेत ही मोठ्या प्रमाणात वोट चोरी झाली असून महाराष्ट्रातील सरकार है वोट चोरीचा सरकार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी पूर्व मतदान यादद्याची तातळीने दुरुस्ती करून स्वच्छ व पारदर्शक मतदार यादी प्रकाशित करावी व याप्रमाणे बोगस मतदार याद्या निर्माण करणाऱ्या कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी काँग्रेस तर्फे करण्यात आली असून लवकरच काँग्रेस तर्फे निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन छेळण्याचा इशारा काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्‌डी यांनी दिला आहे.
याप्रसंगी कामगार नेते अनवर सैय्यद,जिल्हा महासचिव अलीम शेख,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास गुडला, इंटक जिल्हाउपाध्यक्ष शहजाद शेख,कुमार रुद्रारप,सचिन नागपुरे,सुनील पाटील, शहंशाह शेख,अंकुश सपाटे, रंजीत राखुंडे, निखिल पुनगंटी, कपिल गोगला,मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here