तुकडोजी नगर येथे युवकाचा खून

89

तुकडोजी नगर येथे युवकाचा खून



आरोपीला दोन तासांत केली अटक


नितेश केराम
कोरपना येतील तुकडोजी नगरातील 24 वर्षीय युवकाचा खून झाल्याची घटना मंगळवारी पहाटे सहाच्या सुमारास उघडकीस आली विश्वास नरेंद्र मालेकर असे मृतकाचे नाव आहे तर सुनील पवार असे आरोपीचे नाव आहे
सोमवारी सायंकाळी 6 वाजता विश्वास मालेकर यांने धाब्यावर जातो असे आपल्या आईला सांगून निघाला मात्र दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह तुकडोजी नगर येतील हॉटेलच्या शेडमध्ये आढळून आला घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले प्राथमिक तपासात विश्वास मालेकरचा खून झाल्याची स्पष्ट झाले वणी रस्त्यावरील अवैध धाब्यांमुळे ही घटना घडल्यास संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे
खून प्रकरणानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता संतत्प
नातेवाईक व स्थानिक नागरिकांनी धाबा बंद केल्याशिवाय मृतदेह उचलू देणार नाही अशी भूमिका घेतली अखेर पोलीस निरीक्षक गाडे यांनी वणी रस्त्यावरील अवैध धाबा बंद करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठविण्यात आला विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला
मृतकाच्या नातेवाईकांच्या तक्रारी वरून कोरपना पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 103 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान आरोपी सुनील पवार याला शेरज येतुन कोरपना पोलिसांनी अवघ्या दोन तासात अटक केली पोलीस निरीक्षक गाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक देवानंद केकण प्रकाश राठोड प्रभाकर जाधव हवालदार बळीराम पवार पंढरी सिडाम साईनाथ जायभाये व पोलीस शिपाई गुणाजी यांनी ही कारवाई केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here