घुग्घुस शहर अधाक्ष 350 घर क्रमांकात 119 मतदार यादीत दाखविले हि चूक निवडणूक यंत्रणेची

49

घुग्घुस शहर अधाक्ष 350 घर क्रमांकात 119 मतदार यादीत दाखविले हि चूक निवडणूक यंत्रणेची



कांग्रेस ने केलेला आरोप बिनबुडाचे :- संजय तिवारी (भाजपा शहर अध्यक्ष)


घुग्धूस : शहरातील केमिकाल वार्डातील सध्या स्थितीत बंद असलेले घर क्रमांक 350 है सचिन बांदुरकर यांच्या भालकीचे असून या घरात विविध जातीचे धर्माचे आडनावाचे जवळपास 119 मतदार राहत असल्याचे मतदार यादीतून दिसून आले असा आरोप काँग्रेसने केला आहे हे सर्व मतदार 119 घुग्घुसचे असून अनेक वर्षापासून मतदान करत आहे हि चूक निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रपूर यांची असून मतदार यादित 350 हा घर क्रमांक चुकीने अनेक मतदारांच्या नावात आलेला आहे यांनी एकाच घरात बोगस मतदार असल्याचा केलेला आरोप हा पूर्णपणे चुकीचा तथ्यहीन आणि जनतेची दिशाभूल करणारा आहे. निवडणूक आयोगाची प्रक्रिया ही पारदर्शक आणि कठोर नियमावलीनुसार पार पडते. मतदार यादीत नाव समाविष्ट होण्यापूर्वी घरोघरी सर्वेक्षण, कागदपत्रांची पडताळणी आणि आवश्यक त्या चौकशी केल्या जातात. अशा परिस्थितीत बोगस मतदार असण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.
यांचा हा आरोप हा केवळ राजकीय हेतुपुरस्सर पसरवलेल्या अफवा आहे. भाजपच्या वाढत्या जनाधाराने आणि घुग्घुस मधील विकासाभिमुख कामगिरीने अस्वस्थ झाली आहे, त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप उचलले जात आहेत.
घुग्घूस शहरातील नागरिकांनी अशा खोट्या आणि बेभरवशाच्या विधानांकडे दुर्लक्ष करून, विकासाभिमुख, प्रामाणिकपणा आणि जनतेच्या हितासाठी काम करणाऱ्या भाजपवर विश्वास ठेवावा, व निडणूक आयोगाने देशातील मतदार यादीतील पुढील प्रमाणे त्रुटी दूर कराव्या उदा, जसे की मतदारांचे नाव, वडिलांचे किंवा पती,पत्नीचे नाव, जन्म तारीख, लिंग, घर क्रमांक, यादी क्रमांक, यादीतील प्रभाग क्र,अनुक्रमांक, पत्ता, वय, गावाचे नाव, विधानसभेचे नाव, जिल्ह्याचे नाव, इत्यादी. त्रुटी दूर कराव्या असे आवाहन घुग्घूस भाजपा तर्फे करण्यात येत आहे.
तसेच पञपरीषदेत बोलतांना भाजप घुग्घुस शहर अध्यक्ष संजय तिवारी यांनी सांगीतले कि आमच्या शिष्टमंडळ तर्फे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातुन निवडणूक आयोगाला निवेदन देवून नमूद असलेल्या मतदान यादीत त्रुटी दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here