वाघाने केला गाईवर हल्ला मांडवा ‘ जांभूळधरा टांगाळा येरगव्हान शिवारात वाघाची दहशद

45

वाघाने केला गाईवर हल्ला
मांडवा ‘ जांभूळधरा टांगाळा येरगव्हान शिवारात वाघाची दहशद



नितेश केराम
कोरपना तालुक्यातील मांडवा येतील घटना असून गुरखी दि 13 ला नेहमी प्रमाणे जनावरे चरण्यासाठी जांभुळधरा जंगलात गेला जवळपास तीन खंडी जनावराचा कळप चारत असताना दोन च्या सुमारास एका गायीवर पट्टेदार वाघाने हल्ला केला
त्याच वेळी दोन्ही गुराख्याने आरडा ओरड केली त्यामुळे वाघाने गायीला सोडून पळ काढला यात गायीला गँभीर मानेवर जखमा झाल्या गुराख्याला प्रत्यक्ष वाघ दिसल्याने घाबरले तसेच यापूर्वी सुद्धा वाघाने या परिसरात जनावरावर हल्ला केल्याच्या घटना झाल्या असून त्यामुळे परिसरात वाघ असल्याची दहशद निर्माण झाली आहे
सदर गाय नामदेव माधव लसंते याचं मालकीची असून अंदाजे तीस हजार किमतीची असून मालकाचे नुकसान झाले आहे वन विभागाने तात्काळ वाघाचा बंदोबस्त करावा व गाय मालकाची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here