स्वातंत्र दिनाचे अवचित्य साधून प्रबुद्ध नगर भिवापूर वार्ड इथे भिम आर्मी (भारत एकता मिशन) च्या फलकाचे अनावरण.

68

स्वातंत्र दिनाचे अवचित्य साधून प्रबुद्ध नगर भिवापूर वार्ड इथे भिम आर्मी (भारत एकता मिशन) च्या फलकाचे अनावरण.



 चंद्रपुर  :  भिम आर्मी संस्थापक अध्यक्ष खासदार भाई चंद्रशेखर आझाद,राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनयरतन सिंग, महाराष्ट्र प्रभारी भाई अनिल ढेनवाल यांच्या संघर्षमय कार्याला प्रेरित होऊन भारत भर अनेक युवक, युवती, महिला यांचा भिम आर्मीत मोठ्या प्रमाणात प्रवेश होत असताना भिवापूर वार्ड प्रबुद्ध नगर इथे भिम आर्मी च्या फलकाचे अनावरण जिल्हाध्यक्ष सुरेंद्रभाऊ रायपुरे यांच्या हस्ते करण्यात आले.
जिथे अन्याय तिथे भिम आर्मी तसेच गाव तिथे शाखा या उदघोशाला अनुसरून जिल्ह्यात भिम आर्मी अति जोमाने कार्य करीत आहे आणि त्यामुळे जिल्यात सुद्धा भिम आर्मीचे एक वलयं तयार होत आहे, आणि लवकरच भिम आर्मी आम्ही घरा घरात पोहचवू असे अनावरण प्रसंगी जिल्हा अध्यक्ष सुरेंद्रभाऊ रायपुरे यांनी सांगितले.
सदर अनावरण सोहळ्यात चंद्रपूर जिल्हा संघटक विशाखाताई आमटे, तालुका प्रमुख हिमांशूभाऊ आवळे, प्रबुद्ध नगर शाखा प्रमुख राकेशभाऊ आवळे, सचिव नितीन मुन, उपप्रमुख अनिरुद्ध ब्राम्हणे, जिल्हा सदस्य भीमरावभाऊ आमटे, शहर उपप्रमुख धम्माभाऊ उराडे, ऊर्जानगर शाखा प्रमुख छोटुभाऊ तितरे, उपाध्यक्ष संतोषभाऊ खांडेकर, दिनेश करमरकर, अनंत मानकर सोबत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here