चंद्रपूर येथे महाराणी हिराईचे स्मारक उभारुन, चारही ऐतिहासिक गाँडकालीन किल्ले दरवाज्याला गोंड राजांची नाव देण्याची मांगणी

16

चंद्रपूर येथे महाराणी हिराईचे स्मारक उभारुन, चारही ऐतिहासिक गाँडकालीन किल्ले दरवाज्याला गोंड राजांची नाव देण्याची मांगणी



उषाकिरण आत्राम ताराम लेखिका व मुख्य संपादक गोंडवाना दर्शन,तथा विविध आदिवासी संघटना,चंद्रपूर ने मांगणी केली.


चंद्रपुर :
चांदागड चंद्रपूर ही अतिप्राचीन गोंड राजाची राजधानी असून, ९०० वर्षाचा इतिहास लाभलेली गोंडराजनगरी आहे. अनेक राजांसोबतच महाराणी हिराई बिरशाह आत्राम या बहादुर बुध्दिमान राणीने १६ वर्षात १३ युध्द जिंकले व आपल्या राज्यात लोकोपयोगी कल्याणकारी कार्य केले. उत्तम शासक म्हणून सुवर्ण अक्षरात त्यांच्या नावाची नोंद इतिहासाच्या पानावर लिहायला पाहीजे होते. परंतु, तसे न होता त्यांच्याच चंद्रपूर भूमीत त्यांची उपेक्षा केली गेली. त्यामुळेच त्यांचे भव्य स्मारक कुठे ही नाही. कोणत्याच गोंड विरांचे स्मारक नाही. इतरांचा काडीमात्र संबंध नसतांना अनेक पुतळे व रस्त्यांना नावे देण्यात आली. मात्र एकही चौक किंवा रस्ता हा गाँड राजांच्या नावाने चंद्रपुरात नाही. त्यामुळे महाराणी हिराई यांचे भव्य स्मारक दर्शनी भागात शासनातर्फे उभारण्यात यावे. तसेच चारही ऐतिहासिक किल्ले दरवाज्याला राणी हिराई, खांडक्या बल्लाळशाह, वीर बाबुराव शेडमाके व राजे यादवशाह आत्राम यांची नावे द्यावीत, ही समस्त आदिवासी समाजाची मागणी आहे. अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करू असे उषाकिरण आत्राम ताराम गोंडवाना दर्शनचे संपादक आणि आदिवासी लेखक यांनी आदीवासी मंञी तसेच चंद्रपुर जिल्हाचे पालकमंञी डाॅ अशोक उईके यांना पञ पाठवून मांगणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here