पैगंबरांच्या शिकवणीतून प्रेरित : चला रक्तदान करूया, मानवतेला जपूया – मेगा रक्तदान शिबिराचे आयोजन
चंद्रपूर, : ३ सप्टेंबर २०२५ रोजी
यूथ मूव्हमेंट ऑफ महाराष्ट्र, चंद्रपूर युनिट तर्फे दरवर्षी प्रमाणे १२ रबी–उल–अव्वल या पवित्र दिनानिमित्त मेगा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर ५ सप्टेंबर २०२५, शुक्रवार रोजी सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत जटपुरा गेट, चंद्रपूर येथे होणार आहे.
या कार्यक्रमाचे औचित्य मानवतेचे मार्गदर्शक, अल्लाहचे शेवटचे संदेष्टा प्रेषित मोहम्मद सल्लम. ﷺ यांचा जयंती महोत्सव (ईद मिलादुन्नबी) यानिमित्त साधण्यात आले आहे. दिव्य कुरआनमध्ये मानवजातीला उद्देशुन स्पष्ट संदेश आहे की – “जो एक जीव वाचवतो, तो संपूर्ण मानवता वाचवतो. तसेच प्रेषित्यांच्या शिकवणीतून येते की “तुमच्यातील सर्वोत्तम तो आहे, जो लोकांच्या कामी येतो. लोकांची सेवा केल्याने अल्लाहची उपस्थिती लाभते.”
याच शिकवणींमधून प्रेरणा घेत, यूथ मूव्हमेंट ऑफ महाराष्ट्र मागील 17 वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन महाराष्ट्रभर करीत आहे. रक्तदान ही केवळ सेवा नव्हे तर मानवी जीवन वाचवण्याचा आणि समाजात बंधुभाव वाढवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.
तज्ज्ञांच्या मते, महाराष्ट्र राज्यात दररोज सुमारे ८,००० ते १०,००० युनिट रक्ताची गरज भासते. अपघातग्रस्त, थॅलेसिमिया, कॅन्सर तसेच इतर गंभीर आजारांच्या रुग्णांसाठी हा साठा अत्यावश्यक असतो. त्यामुळे रक्तदान शिबिरांमुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात.
या शिबिरात शहरातील युवक, विविध संघटनांचे कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. आयोजकांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावे व मानवतेचा हा संदेश सर्वदूर पोहोचवावा.
आयोजक:
यूथ मूव्हमेंट ऑफ महाराष्ट्र, चंद्रपूर युनिट










