घुग्घुस मनसे तालुका उपाध्यक्ष यांचा नेतृत्वात पक्ष प्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
अनेक युवकांनी मनसे पार्टीत प्रवेश घेतले
घुग्घुस : राजकारणात स्वच्छता, प्रामाणिकपणा आणि जनतेसाठी झगडणारी खरी ताकद म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते मा. राजसाहेब ठाकरे यांच्या स्पष्टवक्तेपणा, ठाम भूमिका व जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्याच्या विचारधारेने प्रेरित होऊन युवक वर्ग मोठ्या प्रमाणावर मनसेशी जोडला जात आहे.
दिनांक ०९/०९/२०२५ रोजी घुग्गुस शहरातील उत्साही युवक महमद शेख ,दशरथ ताजणे ,प्रजत काळे ,सुशांत इंगळे,पवण वांढरे ,श्रवण सोनटके, शांतनु सोनटक्के ,मनोज तुर्विले, कुनाल थेटे ,चेचत काकडे ,
सुभाष तुमडे ,गजानन जालोर, गजानन आमझरे ,भुषण सावनकर ,राहुल सातपुते ,सचिन सिडाम ,सुधिर केसकर, समीर पोतराजे,दुर्गेश कायचाडे ,आदित्य मगेर , धीरज कुडमेठे यांनी मनसेत औपचारिक प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशावेळी मनसेचे मा. पंकज राजपूत (तालुका उपाध्यक्ष चंद्रपूर)यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम पार पडला.
राजसाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्रवादी विचारसरणीवर श्रद्धा ठेवून व पंकज राजपूत यांच्या कार्यपद्धतीला प्रभावित होऊन हा प्रवेश झालेला आहे. युवक वर्गाने मनसेच्या माध्यमातून समाजकारण, जनतेच्या समस्या सोडविणे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी झगडण्याचा निर्धार केला आहे.
या प्रसंगी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नव्या युवकाचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मनसेत प्रवेश केल्यामुळे स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद अधिक भक्कम होऊन जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी नवा उत्साह लाभणार आहे.या वेळी उपस्थित पंकज राजपूत (तालुका उपाध्यक्ष चंद्रपूर ) श्रीकांत देठे (कामगार सेना शहर अध्यक्ष घुगुस) मनसे सैनिक राज शेट्टी,कपिल क्षीरसागर, सुमित सातपुते व मनसे सैनिक उपस्थित होते.










