- पतंजली योग समिती घुग्घुसच्या वतीने जागतिक महिला दिन
- महिलांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम झाले पाहिजे- किरण बोढे
घुग्घुस : येथील पतंजली योग समिती भारत स्वाभिमान शाखेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त संस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन प्रयास सभागृहात करण्यात आले होते.
याप्रसंगी भारत माता, राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले तसेच दीपप्रज्वल करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रयास सखी मंच घुग्घुसच्या अध्यक्षा किरण बोढे, माजी जि. प. सभापती नितु चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्या सुचिता लुटे, वैशाली ढवस, जेष्ठ नागरिक सखुबाई बोबडे, पार्वता जोगी, लीला बोढे, सविता बोढे, पुष्पा रामटेके मंचावर उपस्थित होत्या.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा किरण बोढे आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाल्या, महिलांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम झाले पाहिजे आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहे अशा महिलांना माझा मानाचा मुजरा असे एकही क्षेत्र नाही ज्यात महिला नाही जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना शुभेच्छा.
महिलांनी गीत, नृत्य आणि समुह नृत्य सादर केले.
संचालन अनघा नित तर आभार सुमन वऱ्हाटे यांनी मानले.
यावेळी समितीच्या सुलभा ठाकरे, माया ठेंगणे, सुमन बेलोरकर, मंदा थेरे, कविता झाडे, पुष्पलता बेलोरकर, आशा बोबडे, ज्योती काकडे, प्रिया करकाडे, लता सोनेकर, सपना सातार्डे, वंदना निखाडे, विना घोरपडे, रुंदा कोंगरे, वंदना मुळेवार, सविता सावे, लक्ष्मी वासडे व मोठया संख्येत महिला उपस्थित होत्या.