इंडिया आघाडीच्या उमेदवाराला बहुमताने निवडूनच आणू

37
  1. इंडिया आघाडीच्या उमेदवाराला बहुमताने निवडूनच आणू
    घुग्घुस येथे इंडिया आघाडीच्या बैठकीत नेत्यांचा निर्धार

    घुग्घूस : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्या आहेत
    भारतीय जनता पक्षाने राज्यातील वनमंत्री व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली आहे

    मुनगंटीवार यांची उमेदवारी घोषित होताच काँग्रेस शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 14 मार्च रोजी सांयकाळी 07 वाजता काँग्रेस जनसंपर्क कार्यालयाच्या प्रांगणात इंडिया आघाडीची संयुक्त बैठक घेण्यात आली याबैठकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख बंटी घोरपडे,माजी ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर चिकणकार,ज्येष्ठ नेते रघुनाथ धोंगडे,युवा सेना उप – जिल्हा प्रमुख हेमराज बावणे,ज्येष्ठ नेते गणेश शेंडे,वेदप्रकाश मेहता,लक्ष्मण बोबडे,अनुप कोरांगे,योगेश भांदककर, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष दिलीप पिटटलवार,ज्येष्ठ नेते सत्यनारायण डकरे, युवा नेते शरद कुम्मरवार,आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अमित बोरकर,काँग्रेस नेते अलीम शेख,काँग्रेस जिल्हा सचिव अजय उपाध्ये,एन.एस.यु.आय अध्यक्ष आकाश चिलका, युवा नेते अनुप भंडारी,ज्येष्ठ नेते अनिरुद्ध आवळे,इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख,शेख शम्मीउद्दीन,इंटक जिल्हा सचिव सदय्या,इंटक जिल्हा सचिव तिरुपती गोडगू , तिरुपती महाकाली, कलवेणी,मंचावर उपस्थित होते.

    रेड्डी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना हे लोकसभेची निवडणूक या स्वतंत्र भारताची शेवटची ठरू नये याकरिता सर्व मित्रपक्षाने एकत्रितपणे या हुकूमशाही सरकार विरोधात लढा देणे अत्यंत आवश्यक असून आज देशातील शेतकरी,व्यापारी,महिला,युवक सर्वच त्रस्त झाले असून सर्वांनी एकत्रितपणे या जातीवादी सरकार विरोधात लढा द्या असे आवाहन केले.

    उबाठा पक्षाचे ज्येष्ठ नेते रघुनाथ धोंगडे यांनी केंद्र सरकारवर कडक ताशेरे ओढत हे ईडी,सीबीआयच्या मदतीने चालत असलेले उद्योगपतीचे सरकार असून यांना देशातील जनतेशी काही घेणे देणे नाही नसून यांना पराभूत करने आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले
    आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अमित बोरकर यांनी अब की बार जर भाजप चारशे पार झाली तर नागरिकांना गुलाम व लाचार बनण्या शिवाय पर्यायच राहणार नाही म्हणून ही वेळ आपल्या पक्षाचा विचार सोडून देश रक्षणासाठी सर्वांनी एकत्रितपणे येणे आवश्यक आहे.
    एन.सी.पी. शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष दिलीप पिटटलवार यांनी राज्यातील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडणाऱ्या अलोकतांत्रिक पक्षाला हरविण्यासाठी आपण पूर्ण ताकदीने लढू असा निर्धार व्यक्त केला

    याप्रसंगी मंचावर उपस्थित सर्व नेत्यांनी हातात हात घेऊन एकत्रितपणे लढा देण्याचा निर्धार व्यक्त करीत इंडिया आघाडीच्या उमेदवाराला शँभर टक्के निवडून आणू असा निर्धार व्यक्त केला.

    याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर,सोशल मिडिया अध्यक्ष रोशन दंतलवार,विशाल मादर,मोसीम शेख,दिपक पेंदोर,रमेश रुद्रारप,रोहित डाकूर,बालकिशन कुळसंगे,अरविंद चहांदे,सुनील पाटील,रफिक शेख,कुमार रुद्रारप,संदीप कांबळे,कपील गोगला,सन्नी कुम्मरवार,हरीश कांबळे,आकाश दुर्गे,रंजित राखुंडे,अंकुश सपाटे हे उपस्थित होते
    बैठकीचे सूत्र संचालन देव भंडारी यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here