*कॉंग्रेस पक्षाला कंटाळत कॉंग्रेसच्‍या ५९३ कार्यकर्त्यांचा भाजपामध्‍ये प्रवेश*

48

*राष्ट्रनिर्माणाचे स्वप्न उराशी बाळगत भाजपाची वाटचाल : ना. श्री. सुधीर मुनगंटीवार*

*कॉंग्रेस पक्षाला कंटाळत कॉंग्रेसच्‍या ५९३ कार्यकर्त्यांचा भाजपामध्‍ये प्रवेश*

*चंद्रपूर, दि. १५ :* भद्रावती तालुक्‍यातील कॉंग्रेसच्‍या शेकडो पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीच्‍या विचारांचा स्वीकार करीत व विकासाच्या झंझावाताचे समर्थन करीत पक्षात प्रवेश केला. राज्‍याचे वने, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍य व्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूर-वर्धा जिल्‍ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्‍या प्रमुख उपस्थितीमध्‍ये कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

१२ मार्च २०२४ रोजी भद्रावती येथे कॉंग्रेसच्‍या ५९३ कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्‍ये प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीची ध्‍येय धोरणे राष्‍ट्रनिर्माण करणारी आहेत. प्रगतीच्‍या दिशेन घेऊन जाणारी आहेत. त्‍यामुळे भारतीय जनता पार्टीचा विचार प्रत्‍येक नागरिकापर्यंत घेऊन जाण्‍याचे कार्य करणार आहात. त्‍यामुळेच आपण भारतीय जनता पार्टीमध्‍ये प्रवेश केला. सर्वांचे भारतीय जनता पार्टीत स्‍वागत आहे, असे ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार म्‍हणाले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्‍हाध्‍यक्ष हरीश शर्मा, भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे , माजी जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, चंदुजी गुंडावार, रमेश राजुरकर, नरेंद्र जिवतोडे, प्रविण सातपुते, संतोष आमणे, प्रविण सातपुते, संतोष आमणे, किशोर गोवारदिपे, रुपेश मांडरे, संतोष नागपूरे, प्रविण नागपूरे, विजय वानखेडे, अमित गुंडावार, इमरान शेख यांच्‍या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश घेतला.

भारतीय जनता पार्टीमध्‍ये प्रवेश करणाऱ्यांमध्‍ये कॉंग्रेसचे मुख्‍य नेते सिकंदर भाई शेख व पप्पू शेख यांच्‍यासोबत इस्माईल शेख, सूरज पेंदाम, प्रीतम देवतळे, प्रफुल्ल भोस्कर, योगेश नागपुरे, वैभव मेश्राम, प्रवीण सिंग, शाहिद सय्यद, अभिषेक घुबडे, उत्तम पोईनकर, विकी सोनुने, संकेत सातपुते, प्रशांत लांडगे, जुनेद खान, अथर्व भाके, आकाश नागपुरे, पवन नागपूर, शैलेश वाभिटकर, अमित घोडमारे, दीपक कुळमेथे, अनिल रुयारकर, ऋतिक जाधव, कुणाल बटरवाल, आवेश सय्यद, प्रफुल्ल वानकर, राजू किन्नाके, ऋतिक माकोडे, आतिश डोंगरे, चंद्रभान नागोसे, बंडू ढेंगळे, देवराव टेकम, सुधीर ठाकरे, नरेश त्रिवेदी, नितेश मेहता, सागर सदमवार, अक्षय सदमवार, गणेश पचारे, विनोद कुमार, विनोद प्रसाद, रोहित यदुवंशी, मनोज चौधरी, शाहरुख शेख, सलाउद्दीन सिद्दीकी, आमिर शेख, अय्युब खान, सूरज दुर्गे, सूरज पिंपळशेंडे, गौरव माडी, किशोर चौधरी, सिकंदर गोतकोंडावार आदींचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here