घुग्घुस येथे प्रहार जनशक्ती पक्षातर्फे शहीद भगतसिंग जयंती साजरी

35

घुग्घुस येथे प्रहार जनशक्ती पक्षातर्फे शहीद भगतसिंग जयंती साजरी



घुग्घुस, चंद्रपूर :-
देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत-हसत प्राणांची आहुती देणारे क्रांतिकारक वीर शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त घुग्घुस शहरात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दिनांक २८ सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक भव्य आणि प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रहार जनशक्ती पक्षाचे अमोल भाऊ मांढरे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. उपस्थित नागरिकांच्या डोळ्यांत त्या क्रांतिकारकाची आठवण दाटून आली.
उपस्थितांना लाडूंचे वाटप करण्यात आले, तर गुरुद्वारा कमिटीच्या वतीने खारा व लाडूंचे वितरण करून बंधुभाव आणि ऐक्याचा संदेश देण्यात आला.
या वेळी शहीद भगतसिंग यांच्या क्रांतिकारक जीवनप्रवासावर आणि त्यांच्या बलिदानातून मिळालेल्या प्रेरणेवर विशेष भाष्य करण्यात आले.
समाजातील न्यायहक्कांसाठी सतत संघर्ष करणाऱ्या यास्मिन सय्यद मॅडम व त्यांच्या सहकाऱ्यांचा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला तसेच काही महीला पोलिस कर्मचारी यांचा सुध्दा या ठिकाणी सत्कार सम्मान करण्यात आले .
या सन्मानाने उपस्थितांमध्ये टाळ्यांचा गजर उसळला.
कार्यक्रमाला गुरुद्वारा कमिटीचे अध्यक्ष मा. जतेन्द्र सिंग धारीजी, गुजित सिंग कालसी, जगदिश सिंग, प्रभावीर सिंग, इकनाम सिंग, केशव सिंग, निहाल सिंग यांसारखे मान्यवर उपस्थित होते .
आयोजक मंडळामध्ये अमोल नथ्थुजी मांढरे, गजु भाऊ बोमावार, शंकर कटकुरवार, संतोष जी लोखंडे, पंकज भाऊ धोटे, प्रशांत जी सारोकर, सुभाष जी मांढरे, इरफान शेख, पवन निश्याद, ऑटो चालक कमिटी व गावातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकच संदेश अधोरेखित झाला – “शहीद भगतसिंग यांची स्वप्नं अपूर्ण राहू देणार नाही, समाजातील अन्यायाविरुद्धची प्रत्येक लढाई हाच त्यांच्या बलिदानाला खरी आदरांजली ठरेल.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here