घुग्घुस येथे जडवाहतुकावर कारवाई करण्यासाठी मांगणी

46

घुग्घुस येथे जडवाहतुकावर कारवाई करण्यासाठी मांगणी



मनसे चंद्रपुर तालुका उपाध्यक्ष पंकज राजपुतचा संबंधित विभागाला निवेदन


घुग्घुस : चंद्रपुर व घुग्गुस शहरातील मुख्य रस्त्यांवर सध्या मोठ्या प्रमाणावर जडवाहतूक सुरू आहे. शहराच्या आतमधून जाणाऱ्या या जड वाहनांमुळे सतत वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला असून, अपघातांच्या घटनाही वाढत आहेत. तसेच धूळ, धूर व प्रदूषणामुळे आरोग्यविषयक समस्या गंभीर होत आहेत.
याबाबत RTO विभाग व वाहतूक विभाग चंद्रपुर यांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असून, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे संबंधित विभागाला इशारा देऊन कळविण्यात आले की,शहरात मध्यभागी सुरु असलेल्या जडवाहतुकीवर त्तकाळ नियंत्रण आणून आवश्यक ती कारवाई करण्यात यावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन करेल व त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील.या वेळी उपस्थित पंकज राजपूत( तालुका उपाध्यक्ष चंद्रपूर ) मनसे सैनिक सतीश गोहोकर, श्रीकांत देठे, कपिल क्षीरसागर,अनुप गोहोकर, राज शेट्टी, व मनसे सैनिक उपस्थित होते.
सदर निवेदन पोलीस अधीक्षक चंद्रपुर, प्रादेशिक परिवहन अधिकारी व वाहतुक विभाग अधिकारी चंद्रपुर, पोलीस स्टेशन पडोली, पोलीस स्टेशन घुग्घुस अदी ठीकाणी देऊन मांगणी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here