राहुल गांधीच्या आधी आम्हाला गोळ्या घाला भाजपा प्रवक्त्याला घुग्घूस काँग्रेसचे आवाहन

27

राहुल गांधीच्या आधी आम्हाला गोळ्या घाला भाजपा प्रवक्त्याला घुग्घूस काँग्रेसचे आवाहन

राहुल गांधींना छातीत गोळी घालण्याची धमकी देणाऱ्या पिंटू महादेवनचा काँग्रेस तर्फे जाहीर निषेध

घुग्घूस : केरळमधील भाजपाचे प्रवक्त्ता पिंटू महादेवन याने लाईव्ह टीव्हीवरील चर्चेदरम्यान काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. ‘राहुल गांधींच्या छातीत गोळी घालू’, असे विधान केरळ भाजपा नेते, प्रवक्ते पिंटू महादेवन यांनी टीव्हीवरील चर्चेत केले आहे.
संघ आणि भाजपा हे विषारी विचारांचे घृनीत राजकारण करीत असतात
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना देखील संघाच्या लोकांनी गोळ्या घातल्या होत्या
त्याच विचारांच्या लोकांनी राहुल गांधी यांना देखील गोळ्या घालण्याची धमकी दिल्याने घुग्घूस शहर काँग्रेस ही संतप्त झाली असून राहुल गांधींच्या आधी आमच्या छातीत गोळ्या घाला असे आवाहन काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांनी दिला आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपा प्रवक्त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत त्यांच्या प्रतीमेला शेण फासले व जोड्या चप्पलने मारहाण करीत निषेध व्यक्त केला
सदर आंदोलनात काँग्रेस नेते सैय्यद अनवर,ज्येष्ठ नेते शामराव बोबडे, जिल्हा महासचिव अलीम शेख, शेख शमिउद्दीन,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, जिल्हा सचिव अजय उपाध्ये,इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख,जिल्हा महासचिव पदमा त्रिवेणी, जिल्हा सचिव दुर्गा पाटील, शहर कार्याध्यक्ष दिप्ती सोनटक्के,संध्या मंडल, जोया शेख,रोहित डाकूर,दिपक पेंदोर, सचिन नागपुरे, बालकिशन कुळसंगे,दिपक कांबळे,सुनील पाटील,दिपक पेंदोर, शहशाह शेख,निखिल पुनघंटी,अरविंद चहांदे, कपील गोगला,अनवर सिद्दीकी,अंकुश सपाटे, रंजित राखुंडे,
व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here