धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त घुग्घुस
पंचशील बौध्द विहार येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन
घुग्घुस – ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आज घुग्घुस पंचशील बौध्द विहार मध्ये साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येनं उपस्थित होते . या दिना निमित्त पंचशील बौध्द विहार येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळी घुग्घुस नगर परिषद येथे प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करुन सामुहिक बुध्दं वंदना घेण्यात आली.
त्यानंतर पंचशील बौध्द विहार येथे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा शाखा घुग्घुस सुरेश मल्हारी पाईकराव यांच्या नेतृत्वाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून दिपक शेडके, प्रमुख मार्गदर्शक म्हणून माधव वनकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. तथागत बुध्दं, सम्राट अशोक, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून धम्मध्वजा रोहन करुन सामुहिक बुध्दं वंदना घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
सुरेश मल्हारी पाईकराव, माधव वनकर, हेमंत आनंदराव पाझारे, वैशाली निखाडे, यांनी या दिना निमित्त मार्गदर्शन केले.
अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांनी भारतीय बौद्ध महासभाचा अनुषंगाने बौद्ध बांधवांना मयत मध्ये 14 नियमाचे पालन करावे असे संबोधले जेणेकरून आपण अंधश्रद्धैला बळी पडणार नाही.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून माधव वनकर सर
यांच्या मुलगा कल्पित वनकर बॅक मध्ये नोकरी मिळाल्याबद्दल कोणतीही पार्टी किंवा उत्साह न करता यांनी नवनवीत विहार बांधकामाला कार्यक्रमातच दहा हजार रुपये अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव, हेमंत आनंदराव पाझारे कोषाध्यक्ष, चंद्रगुप्त घागरगुंडे यांच्या उपस्थितीत दान दिले.
सायंकाळी सहा वाजता भीम गीतावर लहान मुलींनी सुंदर नृत्य सादर केले, तर मी बाबासाहेब बोलतो यावर संभाजी उद्धव पाटील यांनी नाटक सादर केले. यानंतर संगितमय प्रबोधन कार्यक्रम करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
कार्यक्रमाचे संचालन जयंत निखाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिल्पाताई सोंडुले यांनी केले.
यावेळेस प्रामुख्याने उपस्थित उपाध्यक्ष शरद पाईकराव चंद्रगुप्त घागरगुंडे कार्याध्यक्ष, यशोधरा महिला मंडळ अध्यक्षा रिताताई देशकर, उपाध्यक्ष प्रतिमाताई कांबळे, सचिव स्मिताताई कांबळे, बबन वाघमारे, प्रविण कांबळे, रवी देशकर, छोटु निखाडे, मधुकर निखाडे, व भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, यशोधरा महिला मंडळ व समस्त बौद्ध बांधव उपस्थित होते










