अभिमानास्प! गरीब घरातील मुलगी बनली पोलिस कॉन्स्टेबल — आई फाउंडेशनतर्फे सत्कार
घुग्घुस, दि. १२ ऑक्टोबर —
घुग्घुसजवळील मातारदेवी गावातील कु. अंजली गणेश रांजेकर हिने आपल्या चिकाटी, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर महाराष्ट्र पोलीस दलात रायगड जिल्ह्यात पोलिस कॉन्स्टेबल म्हणून निवड मिळवून परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे.
सामाजिक आणि शैक्षणिक अडचणींवर मात करत अंजलीने साध्या कुटुंबातून मोठं यश संपादन केल्याने संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या यशाबद्दल आई फाउंडेशन बहुउद्देशीय संस्था, घुग्घुस तर्फे कु. अंजली रांजेकर यांचा त्यांच्या राहत्या घरी शाल, श्रीफळ, शिल्ड आणि मिठाई देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी त्यांच्या आई सौ. संगीता गणेश रांजेकर, वडील श्री. गणेश रांजेकर, भाऊ गौरव रांजेकर तसेच आई फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल मांढरे, सदस्य प्रशांत सारोकर, तुषार बोबडे, सुभाष मांढरे, राजन धाबेकर, जिनेश्वर दिघोरे, संदीप जुनारकर, चेतन कांबळे, वैष्णव डंभारे, राकेश कोयचाळे, तेजस दुर्वे, सुजल हजारे, निलेश मुक्के आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
कु. अंजलीच्या या यशामुळे गावकऱ्यांमध्ये आणि युवा वर्गात प्रेरणा निर्माण झाली असून “मेहनत आणि आत्मविश्वास असेल तर स्वप्नं नक्की पूर्ण होतात” हा संदेश तिच्या कार्यातून उमटला आहे.










