भूस्खलन पीडित१६८कुटुंबांचा पैसा चोरी करणाऱ्या आरोपी वर गुन्हा दाखल करून तातडीने अटक करण्यात यावे – शिवसेना (उबाठा)
घुग्घुस : आज दि. १६/१०/२०२५ रोजी सौ.किरणताई संजय दरेकर *अध्यक्षा-एकविरा महिला पतसंस्था मारेगांव. तथा राष्ट्रीय ओबीसी महीला महासंघ विभागीय अध्यक्ष अमरावती व अध्यक्षा- सन्मान स्त्री शक्तिचा फाउंडेशन*यांच्या मार्फत उपोषण ठिकाणी भेट देण्यात आली आणि भूस्खलन विषयावर सविस्तरपने संपूर्ण माहिती घेतल्यानंतर किरणताई यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस स्टेशन घुग्घुस इथे तक्रार देण्यात आली आहे विषय असा आहे की तीन वर्षांपूर्वी अमराई वार्ड क्रमांक ०१ येथे भूस्खलन झाले होते आणि वे.को.ली वाणी क्षेत्र, घुग्घुस मार्फत या सर्व कुटुंबांना पैसा दि: ०६/१०/२०२४ रोजी देण्यात आला अशे स्पष्टपणे लेखी स्वरूपात देण्यात आले आहे तरी हा पैसा या पीडित कुटुंबांना मिळालेला नाही. पैशाचे लेन देन बँकेच्या मार्फत झाले असेल आणि कोणत्या बँकेतून कोणाचा अकाउंट मध्ये किती पैसा गेला आणि याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी सोबतच दिलेल्या पैशांचे चेक आणि बिल तसेच संपूर्ण लेन देन (transaction) सादर करण्यात यावे आणि आरोपीला अटक करून गुन्हा दाखल करण्यात यावा. या विषयावर गुन्हा दाखल नाही करण्यात आल्यास आम्ही सर्व 168 वेळीच कुटुंब जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आणि एस पी ऑफिस समोर धरणा आंदोलन करू आणि याची संपूर्ण जबाबदारी शासनाची राही याची नोंद घ्यावी.
या वेळी सौ.किरणताई संजयजी देरकर,सौ. सुरेखाताई डेंगळे महिला तालुका प्रमुख वणी, सौ. सीमाताई बालगोनी शहर सचिव वणी,घुग्घुस शिवसेना( उबाठा) अध्यक्ष- बंटी घोरपडे ,हेमराज बावने (युवा सेना उपजिल्हा प्रमुख),जेष्ठ नेते – प्रभाकर चिकनकर, वरिष्ठ नेते – बाळू चिकनकर, वरिष्ठ नेते – अजय जोगी, इंजि
अमित बोरकर शहर संघटक,चेतन बोबडे (लोकसभा अध्यक्ष युवासेना कॉलेज कक्ष) , गणेश शेंडे – वरिष्ठ नेते ,योगेश भांदककर – उपतालुका प्रमुख ,जेष्ठ नेते – रघुनाथ धोंगडे,पवन नागपूर, गणेश उईके-आदिवासी जेष्ठ नेते, मारोती जुमनाके – सामाजिक कार्यकर्ता ,वेदप्रकाश मेहता, जेष्ठ नेते – गजानन बांदुरकर,लक्ष्मण बोबडे,अनुप कोंगरे, किशोर चौधरी, हर्ष चौधरी,राजू नाथर, प्रफुल खोंडे, आणि सर्व उपोषण करता उपस्थित होते.










