चंद्रपुर रामनगर हद्दीत अवैधरित्या गौण खनिज (रेती) ची वाहतुक करणाऱ्या इसमांविरुध्द कारवाई
हायवा ट्रक रेतीसह एकुण ४०,६०,०००/- रुपयाचा माल जप्त
स्थानिक गुन्हे शाखा,चंद्रपूरची कामगिरी
चंद्रपुर :
दिनांक २० नोव्हेंबर, २०२५ रोजी मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पथक पोलीस स्टेशन रामनगर हद्दीत सापळा रचुन अवैधरित्या गौण खनिज (रेती) ची चोरटी वाहतुक करीत असलेला हायवा ट्रॅक पकडुन रेती वाहतुक करणाऱ्या आरोपी नामे रामभाऊ मारोती पेशने वय ५५ वर्ष रा. विसापुर ता. बल्लारपूर यास ताब्यात घेवुन त्याचेविरुध्द पोलीस स्टेशन रामनगर येथे कलम ३०३(२), ३(५) भारतीय न्याय संहिता, सहकलम ४८ (७), ४८(८) म.ज.म.स. सहकलम १७७ मो. वा. का. अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असुन आरोपीचे ताब्यातील हायवा ट्रक क्रमांक एम.एच. ३४-सीक्यु-७७७८ किं. अं.४०,००,०००/- रु. आणि हायवा ट्रक मधील एकुण ५ ब्रास गौण खनिज (रेती) किं. ५०,०००/- रु. आणि एक नग विवो कंपनीचा मोबाईल किं. अं.१०,०००/- असा एकुण ४०,६०,०००/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला असुन गुन्हयाचा तपास रामनगर पोलीस करीत आहे.
सदरची कारवाई मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर, ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांचे नेत्त्वात सपोनि दिपक कोक्रेडवार, पोउपनि संतोष निंभोरकर, पोहवा गणेश भोयर, पोअं प्रदीप मडावी, अजित शेन्डे यांनी केली आहे.