*आमदार देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त लाडू तुला कार्यक्रम उत्साहात साजरा*

12

*राजुराकरांच्या ऋणात कायम राहणे पसंत करेन – आमदार देवराव भोंगळे*


आमदार देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त लाडू तुला कार्यक्रम उत्साहात साजरा*l


राजुरा : अवघ्या एका वर्षात भाजपा जनसंपर्क कार्यालय व सेवा केंद्राच्या माध्यमातून मी केलेल्या सेवाकार्याला आशिर्वाद म्हणून राजुऱ्यातील जनतेने मला भरभरून प्रेम व आशिर्वाद दिला; आपल्या मताशिर्वादामुळे आपला सेवक म्हणून मला विधानसभेत जाता आले, त्यामुळे मला कायम तुमच्या ऋणात राहायला आवडेल. अशी भावना आमदार देवराव भोंगळे यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली.
राजुरा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त राजुरा येथील संकटमोचक हनुमान मंदिरात गुरुवारी रात्री राजुरा शहरातील सर्व भाजपा पदाधिकारी ,कार्यकर्ते व नागरिकांच्या वतीने आयोजित लाडू तुला कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी आमदार भोंगळे बोलत होते.
यावेळी हनुमान मंदिरात महाआरती व पूजा-अर्चना करून सर्वत्र मंगलतेची कामना केली. त्यानंतर आमदार भोंगळे यांच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि जनसेवेतील यशासाठी लाडू तुला करून विशेष प्रार्थना करण्यात आली. यावेळी मंदिर परिसरात भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहून आमदार देवराव भोंगळे यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
आमदार भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त राजुरा शहरात महारक्तदान शिबिरासह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राजुरा शहरातील सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, मंदिरातील भक्तगण व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here