चंद्रपुर : दिनाक 23.11.2025 रोजी पो.स्टे. नागभीड अंतर्गत पेंढरी रेंगातुर शेतशिवारातील नाल्याजवळ चालु असलेल्या अवैध कोंबडा बाजार अड्डयात धाड टाकुन एकुण पांच आरोपीना पकडण्यात आले.
01) आरोपी नामे जाबीर हयादखॉ पठाण वय 33 वर्षे रा. नागभीड 02) रोशन यादव देव्हारे वय 36 वर्षे रा. नवखळा 03) खुशाल उर्फ सचिन गणेश नान्हे वय 30 वर्षे रा. नवखळा 04) संजय रामदास माथनकर वय 44 वर्षे रा. नवखळा 05) निखील रविंद्र समर्थ वय 25 वर्षे रा. नवखळा सर्व ता. नागभीड जि. चंद्रपुर यांचे ताब्यात एकुन तीन जखमी कोंबडे किंमत 900/- रूपये व दोन लोखंडी धारदार कात्या व दोऱ्या किंमत 500/-रूपये तसेच आरोपी क्रं.01 ते 05 यांचे अंगझडतीत /- 3500 रूपये, कोंबडा बाजार अड्डड्यावर नगदी 600/-रूपये, आरोपींचे घटनास्थळी मिळालेल्या जुन्या वापरत्या एकुण 07 मोटारसायकल किंमत 2,70,000/-रूपये असा एकुण 2,75,500/- रूपयेचा मुद्देमाल कोंबडयाचे पायाला धारदार कात्या बांधुन कोंबडयाची झुंज लावुन त्यावर पैशाची बाजी लावुन हारजितचा जुगाराचा खेळ खेळताना मिळुन आल्याने नमुद 05 आरोपी विरूध्द महाराष्ट्र जुगारबंदी अधिनियमान्वये कार्यवाही करण्यात आली.
सदरची कार्यवाही मा.श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधिक्षक, चंद्रपुर मा.श्री. ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, मा.श्री. राकेश जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी, ब्रम्हपुरी श्री. रमाकांत कोकाटे, पोलीस निरीक्षक पो.स्टे. नागभीड यांचे मार्गदर्शनाखाली पो.उपनि. अजिंक्य गोविंदलवार, पोहवा/1140 नरेश वाढई, पो.अं./1971 दिलीप चौधरी, पो.अं./1479 भरत घोळवे, पो.अं./1317 प्रफुल रोहनकर यांचे पथकाने केली.