रामनगर पोलीसांनी चोरीच्या ०५ बॅटरी व ०४ जॅक केल्या जप्त

21

रामनगर पोलीसांनी चोरीच्या ०५ बॅटरी व ०४ जॅक केल्या जप्त



आरोपीकडुन एकुण ९८,०००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


चंद्रपुर :
दिनांक २३/११/२०२५ रोजी फिर्यादी नामे करण अर्जुन झामरे वय २३ वर्ष व्यवसाय ट्रान्सपोर्ट रा. कोसारा माउंट झी लिटरेला स्कुल च्या मागे ता. जि. चंद्रपुर. हे दिनांक २३/११/२०२५ रोजी पोलीस स्टेशन रामनगर येथे येवुन तोंडी रिपोर्ट दिली की, त्यांचा ट्रक ड्रायव्हर सुधीर गायकवाड यांनी फिर्यादी यांचा ट्रक दिनांक २०/११/२०२५ रोजी चे रात्रौ ०८:०० वा. त्याचे घराचे बाजुला रोडलगत त्यांचेच ना दुरुस्त ट्रक च्या बाजुलाच रोडलगत लावुन ड्रायव्हर आपल्या घरी निघुन गेला व दिनांक २१/११/२०२५ रोजी ड्रायव्हर सुधिर गायकवाड हे सकाळी त्यांनी उभे केलेल्या ट्रक कडे गेले असता त्यांना ट्रक ची कॅबीनच्या खिडक्या उघड्या दिसल्या वरून त्याने मला फोन केला असता मी माझे ट्रक कडे जावुन ट्रक ची पाहणी केली ट्रक क. एम.एच. ३४ एम.८६७४ याची लाल रंगाची बॅटरी जुनी वापरती कि.अं. ४,०००/- रू, व हायड्रोलीक जॅक कि.अं. २,०००/- रू तसेच ट्रक क्रमांक एम.एच. ३४ ए.बी. ३८५९ याची इनोव्हा कंपनीची लाल रंगाची बॅटरी जुनी वापरती कि.अं. ४,०००/- रू असा एकुण १०,०००/- रू चा मुद्देमाल दिसुन आला नाही. ते सामान कोणी तरी अज्ञात चोरानी चोरून नेल्याच्या लेखी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
सदर गुन्हयाचे गांभीर्य बघुन वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली मा. आशिफ राजा शेख वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन रामनगर यांचे नेतृत्वात चोरी करणारे ईसम यांचा गोपनीय यत्रना लावुन सदर आरोपीचा शोध घेत असतांना गोपनीय माहिती मिळली की, यातील आरोपी नामे १) सप्रेम लेमचंद दुर्गे वय १९ वर्ष धंदा मजुरी रा. एम.आय.डि.सी. हनुमान नगर चंद्रपुर जि. चंद्रपुर. २) अख्तर गुलाम हुसेन वय २० वर्ष धंदा मजुरी रा. म्हाडा कॉलनी दाताळा चंद्रपुर हे नाईट गस्त पेट्रोलिंग दरम्यान मोटारवर बॅटरी घेवुन जात असताना दाताळा रोड चंद्रपुर येथे मिळुण आल्याने सदर आरोपीताना विश्वासत घेवुन विचारपुस केली असता सदर दोन्ही आरोपी कडुन चोरीच्या बॅटरी व जॅक मिळुन आले ते खालील प्रमाणे.
१) एक जुनी वापरती इनोव्हा कंपनीची INB-100Z असे हिलेली लाल रंगाची बॅटरी कि.अं. ४,०००/- रू
२) वापरलेली AXON कप लाल रंगाची बॅटरी. ४,०००/- रुपये
३ ) एक जुनी वापरती AXON कपनीची लाल व पांढ-या रंगाची बॅटरी कि.अं. ४,०००/- रू
४) एक जुनी वापरती EXIDE कंपनीची XPRESS- MHD1000 ची काळया व पांढ-या रंगाची बॅटरी कि.अं
४,०००/- रुपये
५) एक जुनी वापरती PRYCAL कंपनीची PN90 ची लाल व पांढ-या रंगाची बॅटरी कि.अं. ४,०००/- रू
६) काळ्या रंगाची आणि लाल पट्ट्यासह जुनी वापरलेली हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस कार, तिचा अनुक्रमांक एम.एच. ३४ सीजी. ६११० किमी आहे. रु. ७०,०००/-
७) जुनी वापरते तिन हायड्रोलीक जॅक प्रत्येकी कि. अं. २,०००/- रू प्रमाणे असा एकुण ६,०००/- रू
8) जुना वापरता साधा जक के.ए. रु 2,000/-
असा एकुण ९८,०००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कार्यवाही मा. श्री. मुम्मका सुदर्शन साहेब पोलीस अधिक्षक चंद्रपुर, मा. श्री. ईश्वर कातकडे साहेब अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपुर, मा.श्री. प्रमोद चौगुले साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. आशिफ राजा शेख वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन रामनगर यांचे नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील अधिकारी स.पो. नी. देवाजी नरोटे, हनुमान उगले, निलेश वाघमारे, व कर्मचारी पो. हवा. आनंद खरात  जितेंद्र आकरे ब.नं. ५६६, शरद कुडे ब.नं. २२७३, लालु यादव ब.नं. २४३०, बाबा नैताम ब. नं. २२५३, गजानन नागरे ब.नं. १९१२, पो. हवा. रामप्रसाद नैताम ब.न. १३०६ म.पो.हवा. मनिषा मोरे ब.नं. ४६२, पो.अं. रविकुमार ढेंगळे ब.नं. ८४७, पंकज ठोंबरे ब.नं. १२३०, प्रफुल पप्पुलवार ब.नं. ६३०, संदिप कामडी ब.नं. ८८१, सुरेश कोरवार ब.नं. २२९१, पंकज पोंदे ब.नं. ७३४, व म.पो.अं. ब्ल्युटी साखरे ब.नं. २६५३ यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here