बुद्धा कंपणीत भंगार माफियांची टोळी सक्रिय; सुरक्षा रक्षक,संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष? का
नागरिकांमध्ये तीव्र संताप
घुग्घुस : – बुध्दा कंपनीच्या रेलवे साइडिंग परिसरात जीओसी वेकोलि खाणीच्या मुंगोली ते घुग्घुस GOC दरम्यान सुरू असलेल्या रेलवे रुळाच्या कामादरम्यान भंगार चोरट्यांची टोळी सक्रीय असून लोखंडी साहित्य चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. रक्षणकर्त्यांनीच भक्षकाची भूमिका घेतल्याचे चिंताजनक चित्र समोर येत असून परिसरात गंभीर असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
काम चालू असलेल्या परिसरात काही कामगार आणि बाहेरील टोळी यांच्यात संगनमत असल्याचीही चर्चा असून, रात्री उशिरा १ ते १.३० च्या सुमारास मोठ्या प्रमाणावर लोखंडी साहित्य चोरी होत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. शेकडो टन लोखंडी साहित्य लपवून ठेवल्याचे आणि त्याची अवैध विक्री केल्याचे आरोप नागरिकांनी केले आहेत.
तसेच बुध्दा रेलवे कंपनीत तसेच संलग्न ठेकेदार कंपनीत कार्यरत असलेल्या काही कामगारांचे पोलीस व्हेरिफिकेशन अद्याप न झाल्याचे उघड झाले आहे. यामुळे चोरीच्या घटनांना आणखी खतपाणी मिळत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
संबंधित परिसरात पोलीस गस्त अत्यंत कमी प्रमाणात दिसत असल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली जात असून चोरट्यांनी झाडी–झुडपात लोखंडी साहित्य लपवून ठेवल्याची खात्रीशीर माहिती नागरिकांकडून समोर आली आहे.
नागरिकांची मागणी :
चोरीत सहभागी असलेल्या सर्व कामगारांचे तात्काळ पोलीस व्हेरिफिकेशन करण्यात यावे.
झाडी-झुडपात लपविलेले सर्व अवैध साहित्य ताब्यात घेऊन कायदेशीर जप्ती आणि कारवाई करण्यात यावी.
परिसरातील पोलीस गस्त वाढवून तातडीने चोरीच्या घटना रोखाव्यात.