नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्हयात एकुण ३६३ इसमांविरुध्द हद्दीत येण्यास मनाई

2

नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्हयात एकुण ३६३ इसमांविरुध्द हद्दीत येण्यास मनाई

चंद्रपूर जिल्हयातील विविध नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचया पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्हयातील शांतता व सामाजिक सलोखा कायम रहावा आणि कायदा व सुव्यव्यस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणुन पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे नेतृत्वात जिल्हयातील पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांनी आप-आपले पोलीस स्टेशन ह‌द्दीतील शांतता भंग करणारे एकुण ३६३ इसमाविरुध्द कलम १६३ (२) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ अन्वये संबंधीत पोलीस स्टेशन हद्दीत येण्यास मनाईचा हूकूम व्हावा म्हणुन प्रस्ताव तयार करुन अपर पोलीस अधिक्षक यांनी २७८ तर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी ८५ असे जिल्हयात एकुण ३६३ इसमांविरुध्द ३ दिवसांकरीता त्यांच्या पोस्टे हद्दीत येण्यास मनाई (हद्दपार) चा आदेश पारीत करण्यात आला आहे.

मात्र सदर इसमांना निवडणुकीच्या रोजी सकाळी ०८:०० ते दुपारी १२:०० वाजेपर्यंत मतदान करता येईल. म्हणजेच त्यांना मतदानापासुन वंचीत ठेवण्यात आले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here