- सराईत गुन्हेगार तलवारीसह स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर चे ताब्यात.
घुग्घुस :-चंद्रपुर दिं 20 मार्च 2024 रोजी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधिक्षक सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे रात्रौला ऑलआउट मोहीम व गुन्हेगार शोध मोहीम पेट्रोलिंग करीत असंताना महेश कोंडावार, पो.नी. स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व पथक यांना गोपनिय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, इंदिरा नगर, बॉम्बे प्लॉट, चंद्रपूर येथे राहणारा शंकर काशीवेल खिल्लन वय 21 वर्ष हा नंदी मोहल्ला बॉम्बे प्लॉट येथे सार्वजनिक ठिकाणी आमरोडवर धारधार नंगी लोखंडी तलवार आपल्या हातात बाळगूण जनमाणसामध्ये दहशत निर्माण करण्याच्या ईरादयाने फिरत आहे. या खबरेवरून सदर ठिकाणी लपत छपत जावून छापा टाकला असता त्याचे जवळ लोखंडी धारधार तलवार 3000 किमती रुपयाचे तलवार मिळुन आल्याने जप्त करण्यात आली.
आरोपीने तलवारी सारखे घातक शस्त्रे बेकायदे शिरपणे ताब्यात बाळगुन फिरत , जिल्हाधिकारी चंदपूर यांनी एमएजी/कार्या-8/टे 3/साले/2023/1832 दि.14/03/2024 अन्वये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे दुष्टीने विवक्षीत कृतीना मनाई करणे व अव्यवस्थेला प्रतिबंधात्मक उपाय करणे तसे पुढिल आगामी काळात लोकसभा निवडणुक व सन उत्सव असल्याने सदर आरोपीचे कृत्य हे शासकीय नियमाचे उल्लघन करणारे असुन त्यावरून त्याचे विरूध्द पोस्टे रामनगर येथे कलम 4,25 ऑर्म अॅक्ट 1949 सह.क.135.37 (1),37 (3), महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अन्वये गुन्हयात ताब्यात घेवून अन्वये गुन्हा नोंद करण्यात आले,
सदरची यशस्वी कामगीरी पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन सा. चंद्रपूर, अप्पर पोलीस अधिक्षक, रिना जनबंधु मॅडम यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक, महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, सपोनि हर्षल ऐकरे, पोउपनि विनोद भुरले पो.हवा. संजय आतकुलवार, नापोअ. संतोष येलपुलवार, पो.अ नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार यांनी केली.