वढा, घाटात रेती तश्करी करताना दोन टॅक्टरसह दोन आरोपीस अटक
घुग्घुस:
दिनांक 22/03/24 रोजी सपोनी तायवाडे व पोलीस स्टाफ घुग्घुस पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना मुखबीर कडुन माहीती मिळाली की वढा पांढरकवळा नदी घाटातुन दोन टॅक्टर अवैधरित्या रेती चोरी करून वाहतूक करीत आहे दिलेल्या सुचनेनुसार पोलीस दल पांढरकवडा ते शेणगाव रोड दरम्यान सापळा रचून दोन ट्रॅक्टर MH 29. Ak. 5288 , एक विना क्रमांकाचे महिंद्रा कंपनीची ट्रॅक्टर प्रत्येकी एक ब्रास रेती 20000 रू व ट्रॅक्टर ट्रॉली अंदाजे किंमत दहा लाख असा एकूण 10, 20,000 रू माल जप्त करून अपराध क्रमांक 116/2024 कलम 379, 34 भा द वी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला।
आरोपी 1) नंदकिशोर नामदेव आत्राम वय 25 वर्ष 2) प्रशांत यशवंत उपरे वय 43 वर्ष दोन्ही राहणार शेणगाव घुग्घुस त,जि,चंद्रपूर यांना रेती तश्करीत
दिनांक 22/03/2024 चे 02.53 वा अटक करण्यात आले.कारवाई घुग्घुस पोलीस निरीक्षक सोनटक्के याच्या मार्गदर्शनाखाली मनोज धकाते,सचिन तायवाडे महेंद्र भुजाडे नितीन मराठे,महेश भोयर ,विजय ढपकस, रवि वाभीटकर, अनिल बैठा अदीनी केली आहे