घुग्घुस चंद्रपुर महामार्गावर महाकुर्ला गावाजवळ डिझेल टँकर पलटी, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली,
घुग्घुस :-चंद्रपूर घुग्घुसकडे जाणारा डिझेल टँकर महाकुर्ला वळणावर पलटी चौदा चाकी ट्रक टॅंकर क्रमांक, जीजे 12 बी झेड 9423. हा ट्रक टॅंकर धन्ना सेठ रा,गुजरात असून, वाहन चालक भुपेंद्र यादव वय वर्षे 45 अंदाजे रा, गुजरात, 35 हजार लिटरच्या डिझेल टॅंकर घेऊन चंद्रपूरवरुन धारोरा मार्गाने जासाठी निघाले असतांना सदर ट्रक टॅंकर सास्ती येथील चड्डा कंपनीत जाण्यासाठी निघाले वेळी मध्यांतर महाकुर्ला वळण मार्गाच्या मुख्य डाव्या बाजूला रोडच्या खाली पलटी झाले,तर समोरुन दुचाकीस्वारने ट्रिपल सिट समोरच येवून अचानकच ब्रेक केला ट्रक टॅंकर चालकाने दुचाकीस्वारास वाचविण्यासाठी ईर्मेंर्जीं ब्रेक मारल्याने ट्रक चालकाचे टॅंकरचे व चालकाचे संतुलन बिघडले व ट्रक खाली पलटी झाले, दहा ते पंधरा हजार लिटर डिझेलच्या व वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच खाली पडत असलेला डिझल डबकीत भरून मोठ्या प्रमाणात साठा करीत असलेल्या लोकांची गर्दी पहायला मिळाली,सुदैवाने मोठी जीवितहानी टळली,