- चंद्रपुर जिल्एहात एका आठवडयात 3 सराईत गुन्हेगारांवर तडिपारीची कारवाई*क
चंद्रपुर :-आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा पोलीस दल सक्रिय झाला असुन मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, मा. रिना जनबंधू, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदशीखाली सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाईची धडक मोहिम हाती घेतली आहे.
आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या तोंडावर जिल्हात शांतता अबाधीत राखण्या करीता चंद्रपूर जिल्हयातील शरीरा विरुद्ध व मालमत्ते विरुद्धचे सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्या सबंधाने पोलीस अधीक्षक साहेब, चंद्रपूर यांनी आदेश पारीत करताच पो.स्टे. चंद्रपूर शहर येथील 1) शुभम अमर समुद वय 26 वर्षे रा. पंचशील वार्ड, चंद्रपूर पो.स्टे. रामनगर येथील 2) शारूख नुरखा पठाण वय 29 वर्षे रा. अष्टभुजा वार्ड जयश्री लॉन जवळ, चंद्रपूर 3) नैनेश उर्फ लाला नितीन शहा वय 31वर्षे रा.लुबीनी नगर बाबुपेठ वार्ड, चंद्रपूर यांना या आठवडयामध्ये तसेच पो.स्टे. वरोरा येथील 1) मोहन केशव कुचनकर वय 25 वर्षे रा.चिरघर लेआऊट वरोरा जि. चंद्रपूर यास मागील आठवडया मध्ये कलम 56 (1) (अ) (ब) म.पो.का. अन्यये चालु महिण्यात असे एकूण 4 इसमांना 6 महिण्या करीता चंद्रपूर जिल्हयातून तडीपार करण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन सा. चंद्रपूर, अप्पर पोलीस अधीक्षक, रिना जनबंधु मॅडम यांचे मार्गदर्शनात नाओमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा, सुधाकर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर,महेश कोंडावार, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी मोलाची कामगीरी बजावून आतापर्यंत नमुद इसमांना 6 महिण्या करीता चंद्रपूर जिल्हयातून तडीपार करण्यात आलेले आहे.