हत्तीपाय रोग निर्मुलणासाठी सार्वत्रिक मोहीम सुरू
- हत्तीपाय रोग तपासणी मोहीम घरो-घरी सुरू करण्यात आला
घुग्घुस : सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन तर्फे दिलेल्या मार्गदर्शाना द्वारे तसेच सुचनेनुसार जिल्हा आरोग्य विभाग चंद्रपुर द्वारे हत्तीपाय रोग निर्मुलणासाठी सार्वजनिक औषधोपचार मोहीम 26 मार्च पासून जिल्हा तसेच तालुक्यात प्राथमिक आरोग्य घुग्घुस येथे सुरू करण्यात आला आहे.
हत्तीपाय रोग निर्मुलणसाठी जिल्हात तसेच तालुक्यात वेगवेगळ्या ठीकाणी मास्टर प्लान तयार करण्यात आला.सार्वजनिक औषोधपचार प्रभावी राबविणे,हत्तीपाय रोग दुरीकरण करने,सार्वजनिक औषोधपचार लोक सहभाग वाढविणे,मोहीमेत सार्वत्रिक तालुका लेवलवर समन्वय समीतीची बैठक घेणे,मोहीमेत व्यापक जनजागृती करने,मोहीम 100 टक्के यशस्वीपणे पार पाळणे असे सुचणा डाॅ.अशोक कटारे जिल्हा आरोग्य अधिकारी चंद्रपुर यांनी आरोग्य अधिकारी तसेच वैधकिय अधिकारी याना दिली.
प्राथमिक आरोग्य केंद्र घुग्घुस येथे सुरू झालेला हत्तीपाय रोग निर्मुल मोहीम मध्ये घुग्घुस येथील बुथ टीम तसेच आशा वर्कर घरोघरी सर॔क्षण अंतर्गत तपासणी करून गोळया खाऊ घालत आहे.तरी सर्वानी घरो-घरी येणाऱ्या कर्मचारी वर्गाकडुन समोरा-समोर गोळया सेवन करावे असे अव्हान डाॅ.मुनेश्वरी तालुका आरोग्य अधिकारी चंद्रपुर व डाॅ.निलेश पडगिलवार वैथकिय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र घुग्घुस ने नागरीकानी केली आहे.शासनाकडुन राबविलेल्या मोहीमेत उचीनुसार,वयानुसार,वर्षानुसार डीईसी तसेच अल्बेन्डाझोल दवाई हत्तीपाय रोग ग्रस्ताना दिली जाणार आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र घुग्घुस येथे सुरू असलेला हत्तीपाय रोग सार्वत्रिक औषोधपचार मोहीमेत डाॅ.अनघा उंदीरवाडे,प्राथमिक आरोग्य केंद्र घुग्घुस, संतोष बोरीकर,एच ए एम,कुंभारे एच ए एम,के.डी.लिंगायत एच ए एफ,के.एम.चंदनखेडे ए एच एम,थोरात सिस्टर तसेच सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारीनी खुप परीश्रम करीत आहे.