- दिव्यांग संघटनेचा सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना पाठिंबा
घुग्घुस येथील दिव्यांग संघटनेने चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाचे उमेदवार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
शनिवार, ३० मार्च रोजी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांची भेट घेतली व चर्चा करून चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेचे उमेदवार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना आपला पाठिंबा जाहीर करीत निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.
ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी मदत, दिव्यांग बांधवांना जागा देणे, ५% निधी देणे, घर देणे, तीन चाकी सायकल देणे, अशा विविध मागण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहे.
यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, माजी सरपंच संतोष नुने, संघटनेचे इसरार सिद्दीकी, दादामियाँ शेख, नाजमा कुरेशी, गणेश कामतवार, संदीप तेलंग, सुनंदा लिहीतकर उपस्थित होते.