लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर १३ सराईत गुन्हेगारांवर चंद्रपुर जिल्हा पोलीस अधीक्षक कडुन तडीपारीची कारवाई
चंद्रपुर :
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्हा पोलीस सक्रिय झाला असुन मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, रिना जनबंधू अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर ,यांचे मार्गदर्शनाखाली सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई ची धडक मोहीम हाती घेतली आहे.
आगामी लोकसभा निवडणुक २०२४ च्या तोंडावर जिल्हयात शांता अबाधित राखण्याकरीता चंद्रपूर जिल्हयातील शरीरा विरूध्द व मालमत्ते विरूध्दाचे सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यास संबंधाने पोलीस अधीक्षक चंद्रपूर ,यांनी आदेश पारीत करताच १) शुभम अमर समुद, वय २६ वर्ष रा. पंचशिल वार्ड चंद्रपर २) शाहरूख नुरखा पठाण वय २९ वर्ष रा. अष्टभुजा वार्ड जयश्री लॉन जवळ चंद्रपूर ३) नैनेश उर्फ लाला नितीन शहा वय ३१ वर्ष रा. लुंबिनी नगर बाबुपेठ वार्ड चंद्रपूर ४) मोहन केशव कुचनकर वय २५ वर्ष रा. चिरघर लेआउट वरोरा ता. वरोरा ५) दर्शन उर्फ बापु अशोक तेलंग वय २२ वर्ष रा. मौलाना आझाद वार्ड बललारशाह ६) मुनिर खान वहीद खान पठाण वय ५५ वर्ष रा. शिवनगर नागभिड ता. नागभिड ७) शिवशाम उर्फ भिस्सु दामोधर भुर्रे वय २५ वर्ष रा. हनुमान नगर ब्रम्हपुरी यांना मागील आठवडयामध्ये कलम ५६ (१) (अ) (ब) मपोका अन्वये ६ महिन्यात करीता चंद्रपूर जिल्हयातुन तडीपार करण्यात आलेले आहे.
तसेच या आठवण्यात पो. स्टे. घुग्घुस येथील १) अरविंद बापुजी उरकुडे वय ४५ वर्ष रा. अमराई वार्ड क्र. १ घुग्घुस २) प्रताप रमेश सिंग वय २६ वर्ष रा. अमराई वार्ड क्र. १ घुग्घुस, पो. स्टे. रामनगर चंद्रपुर पोलीस येथील १) शामबाबू चंद्रपाल यादव वय २९ वर्ष रा. बिएमटी चौक रयतवारी कॉलरी चंद्रपूर ३) राजेश मुन्ना सरकार वय ४७ वर्ष रा. इंडस्ट्रीय वार्ड बंगाली कॅम्प चंद्रपूर ३) संतोष उर्फ विक्की भास्कर दुसाने वय ३० वर्ष रा. सिस्टर कॉलनी चंद्रपूर ४) अरबाज जावेद कुरेशी वय २६ वर्ष रा. आकाशवाणी रोड हवेली गार्डन चंद्रपूर यांना कलम ५६ (१) (अ) (ब) मपोका अन्वये ६ महिणे व १ वर्षा करीता चंद्रपूर जिल्हयातुन तडीपार करण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक चंद्रपूर,मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर ,रिना जनबंधू यांचे मार्गदर्शनात नाओमी साटम, उविपोअधि,वरोरा, सुधाकर यादव, उविपोअधि,चंद्रपूर, दिपक साखरे, उविपोअधि, राजुरा, दिनकर ठोसरे, उविपोअधि, ब्रम्हपुरी,महेश कोंडावार, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर तसेच पोलीस निरीक्षक पो. स्टे. बल्लारशाह आसिफराजा शेख, पो. नि. पो. स्टे. ब्रम्हपुरी, अनिल जिटटावार, पो.नि. पो. स्टे. नागभिड, विजय राठोड, पो. नि. पो. स्टे. रामनगर सुनिल गाडे, पो. नि. पो. स्टे. घुग्घस शाम सोनटक्के यांनी मोलाची कामगिरी बजावुन आता पर्यंत नमुद सराईत इसमांना चंद्रपूर जिल्हयातुन तडीपार करण्यात आलेले आहे.