स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर कडुन पोलीस स्टेशन रामनगर परिसरात एका आरोपीकडुन 7.68 ग्रॅम एम.डी (मेफोड्रॉन) पावडर व होडा अँक्टीवा जप्त करण्यात आला

60

 

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर कडुन पोलीस स्टेशन रामनगर परिसरात एका आरोपीकडुन 7.68 ग्रॅम एम.डी (मेफोड्रॉन) पावडर व होडा अँक्टीवा जप्त करण्यात आला

चंद्रपुर :-स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ने दिनांक 02 एप्रिल रोजी मुखबिर कडुन माहीती मिळाली होती की, एक ईसम नामे शेख नदीम शेख रहीम रा. बंगल खिडकी, चंद्रपूर हा त्याचे खाजगी मोटारसायकल ने एम.डी (मेफोड्रॉन) पावडर घेवुन विक्री करीता बंगल खिडकी, गेट वर येणार आहे अशी खात्रीशीर खबर मिळाल्याने सदर खबरचे माहिती  महेंश कोंडावार, पोलीस निरीक्षक, स्थागुशा चंद्रपुर यांना देवुन सदर खबरेची सहानिशा करण्याकामी सदर ठिकाणी जावुन शेख नदीम शेख रहीम रा. बंगल खिडकी, चंद्रपूर यास ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे फुलपॅन्ट खिशात मध्ये एम.डी (मेफोड्रॉन) पावडर वजन 7.68 ग्रॅम व एक होडा अँक्टीवा एकुण 53,040/- रू चा मुद्देमाल जप्त करून आरोपी व मुद्देमाल पुढील कार्यवाही करीता पोलीस स्टेशन रामनगर यांचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कार्यवाही .सुदर्शन मुम्मका, पोलीस अधीक्षक चंद्रपुर, रीना जंनबधु अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपुर ,यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल एकरे, पोलीस उप निरीक्षक विनोद भुरले, पोलीस अंमलदार संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे, अमोल सावे, गोपाल आतकुलवार, चालक पोलीस अंमलदार रूषभ बारसिंगे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांनी केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here