सावधान पालकांनो…
मॅकरून शाळेत १ ली ते ४ थी चे “ऍडमिशन” धोक्यात…..
•शेड टिनाचे ,पालकांकडून फि आकारणी CBSE दराचे.
•सिटी ब्रांच मॅकरून शाळेला NOC नाही.
•न .प.शिक्षणाधिकाऱ्याचा पत्रात उघड, तरीही शिक्षण विभागाची डोळे झाक ?
वणी:- मॅकरुन स्टुडंट अॅकॅडमी वडगाव टिप, ता. वणी या शाळेला शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, शासन निर्णय दिनांक १७/०६/२०१६ अन्यये नविन शाळा व दर्जावाढकरीता मान्यता मिळालेली आहे. पंरतु सदर शाळेने स्थानांतरण करण्याकरीता मुख्याधिकारी नगर परिषद, वणी तसेच शिक्षणाधिकारी (प्राथ) जि. प. यवतमाळ यांचे कोणतेही नाहरकत प्रमाणपत्र व परवानगी न घेता इयत्ता १ ते ४ चे वर्ग वरोरा रोड वणी येथे सुरु केलेले आहे.ही शाळा मागील एका वर्षापासून अनधिकृतरित्या सुरूच आहे. कारण येथील स्थानिक स्नेहल काटकर गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती,वणी यांचें त्या शाळेशी आर्थिक साटेलोटे असल्याने मागिल 1 वर्षापासुन 1ते 4 थी ची शाळा विना परवाना ही city branch macaroon या नावाने चालवू देखील दिली, त्यांना नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेश घेऊ देण्यात आलें.त्यामुळेच त्या संस्थेचा मालकाचे मनोबल उंचावले. शाळेचा लगत बियर शॉपी व शाळा टीनाचा शेडमध्ये चालू असताना या गटशिक्षणाधिकारी यांनी देखिल डोळे झाक का करण्यात आली. कारण एकच संस्थाचालकाशी आर्थिक साटेलोटे असेलच अशी दाट संशय निर्माण झाला आहे.
विशेषतः या संस्थेचा आणखी एक प्रताप समोर येत आहे साहेब कि,2024-25 चे देखील नविन ऍडमिशन बोर्ड देखील प्रकाशित करुन प्रवेश सूरू केलें आहे. यांवर आपण जातीने लक्ष घालून वणी गटशिक्षणाधिकारी यांचा राजीनामा घेण्यात यावा व नियमानुसार मकॅरून शाळेवर सिटी ब्रांच लवकरात लवकर बंद करुन विद्यार्थांना सोयीचा ठिकाणी हलविण्याचे चे आदेश देण्यांत यावें . येत्या काही दिवसात ” मकॅरून सिटी ब्रांच ” बंद चे आदेश देण्यांत आलें नाहीं तर समस्त वणी युवासैनिक संविधानिक मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, याची सर्वस्वी जबाबदारी शिक्षण विभागाची असेल. असा स्पष्ट इशारा उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी निवेदनातून देण्यात आला