आयुध निर्माणी चांदा (देश रक्षा सामग्री) हिताला सुरूंग लावणार्या KPCL व एम्टा कोळसा खाण वर चौकशी व कार्यवाही करण्याबाबत केंद्रीय रक्षा मंत्रालय चे आदेश.
आयुध निर्माणी चांदा (देश रक्षा सामग्री) हिताला सुरूंग लावणार्या KPCL व एम्टा कोळसा खाण वर चौकशी व कार्यवाही करण्याबाबत केंद्रीय रक्षा मंत्रालय चे आदेश.
अरूण मैदमवार सामाजिक कार्यकर्ता द्वारा तक्रारी च्या अनुषंगाने, मुख्य व्यवस्थापक आयुध निर्माणी चांदा, कडून जिल्हाधिकारी सोबत तातडीची बैठक
,पोलिस अधिकारी भद्रावती ना चौकशी करण्यासाठी आदेश.
चंद्रपुर/भद्रावती :- KPCL कंपनी व कोळसा उत्खनन करणारे एम्टा ह्या कोळसा खाण प्रकल्पांसाठी पर्यावरण विभाग चे अनुमती नुसार, आयुध निर्माणी चांदा शाखा भद्रावती चे वाॅल कंपाऊंड चे 3 किमी दूर अंतरापर्यंत कोणत्याही प्रकारची खाणकाम न करण्यासाठी,व ह्या आयुध निर्माणी चांदा शाखा चे 5 किमी दूर अंतरापर्यंत ब्लास्टिंग व्हायब्रेशन चे प्रतिबंध, मागिल 17 वर्षांपासून कंपनी ला बंदी घातली आहे . परंतु कंपनीने ह्या निर्देशांचे पालन न करता आयुध निर्माणी चांदा शाखा वाॅल कंपाऊंड चे 3 किमी आत खाणकाम व ब्लासटिंग करून नियमांचे उल्लंघन केले असल्याचे दिसून येत आहे. आयुध निर्माणी चांदा मध्ये देश हित सामग्री चे उत्पादन होते,व त्याच सुरक्षा अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु ह्या कंपनी ने मागिल 17 वर्षांपासून वाॅल कंपाऊंड चे 1.6 किमी पर्यंत खाणकाम व ब्लासटिंग करत, देशहित रक्षा सामग्री ला नुकसान करण्याचं प्रयत्न झालेला दिसून येतो. ह्या संदर्भात अरुण मैदमवार सामाजिक कार्यकर्ता द्वारा कंपनी ला लिखित स्वरूपात उत्तर मागितले असता ते निरूत्तर झाले आहे. आयुध निर्माणी चांदा मुख्य व्यवस्थापक ना सुद्धा तक्रार देण्यात आले होते. चौकशी झाली नाही. म्हणून अरूण मैदमवार सामाजिक कार्यकर्ता द्वारा, केंद्रीय रक्षा मंत्रालय ला तक्रार दाखल करण्यात आले होते. त्या संदर्भात रक्षा मंत्रालय ने मुख्य व्यवस्थापक ना तक्रार प्राप्त झाल्यानंतर, जिल्हाधिकारी चंद्रपूर सोबत दि.21/03/2024 ला तातडीची बैठक घेऊन, पुढे चौकशी करण्यासाठी, पोलिस अधिकारी भद्रावती ह्यांना पत्र पाठवले आहे. आता पोलिस अधिकारी चौकशी करून काय अहवाल शासनाला पाठवतील ह्या कडे सर्व सामान्यांचे लक्ष लागून आहे, कंपनी ने पर्यावरण नियमांचे उल्लंघन केले आहे, ह्या प्रकरणी ह्या खाणी चे पर्यावरण ईसी अनुमती रद्द करण्यात यावे, असे तक्रार केंद्रीय पर्यावरण मंत्रालय ला अरूण मैदमवार सामाजिक कार्यकर्ता द्वारा करण्यात आले आहे.