धानोरा-पिपर चौकात भरधाव टँकरची एका हॉटेल व तीन दुचाकीला जोरदार धडक,

81
  • धानोरा-पिपर चौकात भरधाव टँकरची एका हॉटेल व तीन दुचाकीला जोरदार धडक,

 टॅकर  चालक मद्यधुंद अवस्थेत

 

घुग्घुस : धानोरा गडचांदूर मार्गावरील धानोरा पिपरी फाट्यावर आज बुधवार, १३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीचा इमूलशन बिन द्रव्य पदार्थ घेऊन जाणारा सोल टँक क्र. एमएच ४० बीएल ४०२७ चा चालकाने मद्यधुंद अवस्थेत चालवीत असतांना टॅंक अनियंत्रित होऊन रस्त्याच्या मोडीवर एका हॉटेलला धडक दिली यात हॉटेलचे मोठे नुकसान झाले तसेच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन दुचाकीचा हि चेंदामेंदा झाला.

राकेश जुनघरे रा. धानोरा यांची दुचाकी क्र. एमएच ३४ सिइ ९०६३, सचिन मोटघरे रा. धानोरा यांची दुचाकी क्र. एमएच ३४ सीसी १४८५ व अन्य एका दुचाकीचे नुकसान झाले. अपघातात स्नेहा गजानन गुजरकर रा. धानोरा व रितीश संजय जुनघरे रा. धानोरा हे जखमी झाले जखमीना उपचारासाठी गाडेगोने यांच्या खाजगी रुग्णालयात भर्ती करण्यात आले.

टॅंक चालक देवानंद किसन मडावी (३६) रा. चिंचाळा, एमआयडीसी यास घुग्घुस पोलिसांनी ताब्यात घेतले.

अपघात होताच नागरिकांनी मोठी गर्दी केली त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हि माहिती मिळताच उप विभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव, ठाणेदार श्याम सोनटक्के पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले तसेच दंगा नियंत्रण पथकास पाचरण करण्यात आले.

बारूद डिबीएम हा गडचांदूर मार्गाने मुंगोली कोळसा खाणीत जात असतांना मद्यधुंद चालकाचे भरधाव वेगाने वाहन चालवत हॉटेलला जोरदार धडक दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here