ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
घुग्घुस : येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे गुरुवार, ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता थोर समाजसुधारक आणि महिलांच्या शिक्षणासाठी आग्रही असणारे महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.
यावेळी भाजपाचे संतोष नुने, अमोल थेरे, सुरेंद्र जोगी, मिलिंद पानघाटे, कोमल ठाकरे, मारोती मांढरे, कुमार कुम्मरवार, सुनंदा लिहीतकर, खुशबू मेश्राम, नेहा कुम्मरवार, संदीप तेलंग, स्वाती गंगाधरे आदींची उपस्थिती होती.