अपघातात दुचाकीला आग लागल्याने पती ठार तर पत्नी गंभीर गंभीर,अवस्थेत

36

अपघातात दुचाकीला आग लागल्याने पती ठार तर पत्नी गंभीर गंभीर,अवस्थेत

चिमूर :-चिमूर कानपा या राज्य महामार्गावरील शंकरपूर पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या डोमा फाट्यावर चार चाकी व दुचाकी वाहनाच्या अपघातात पती ठार व पत्नी गंभीर जखमी झाली आहे तर मृतकाचे दुचाकी वाहन जळालेले आहे ही घटना सोमवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडलेली आहे.

  • श्रावण बापूराव गुरनुले 48 असे मृतकाचे नाव असून पत्नी कल्पना गुरणुले ह्या गंभीर जखमी आहेत. हे दोघे डोमा येथील रहिवासी असून आज सकाळी लावारी जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेले होते तेंदु पत्ता तोडून स्वतः च्या दुचाकीने घराकडे परत येत असताना डोमा फाट्यावर दुचाकीची धडक शंकरपुर येथे लग्न कार्यासाठी येत असलेल्या स्कार्पिओ या चार चाकी वाहनाला लागली त्यात श्रावण यांना डोक्याला गंभीर मार लागल्याने घटनास्थळीस त्यांचा मृत्यू झाला तर त्यांची पत्नी कल्पना इला गंभीर दुखापत झालेली आहे सोबत असणाऱ्या तेंदूपत्ता तोडणाऱ्या मजुरांनी कलपना हिला लागलीच शंकरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले होते परंतु गंभीर असल्यामुळे तिला चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे तर घटनास्थळी या दूचाकी ने पेट घेतला असून ती जळून खाक झालेली आहे. स्कार्पिओ वाहन चालकाला शंकरपूर येथील बस स्थानकाजवळ अडवून त्यांचे वाहन जप्त करण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे मृतकाला शविच्छेदना साठी चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले आहे अधिक तपास शंकरपूर पोलीस चौकीचे कर्मचारी करीत आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here