घुग्घुस नगरपरिषदेने बुलडोजर द्वारे अतिक्रमण हटविले
सदर कारवाई भेदभावपूर्ण महाविकास आघाडीचा आरोप
घुग्घुस : येथील बसस्थानक परिसर तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक लॉयड्स मेटल्स कंपनी मुख्य प्रवेशद्वारा समोरील भाजीपाला,फळ विक्रेते,चायनीज स्टाल,चाय दुकान,साऊथ इंडियन डोसा सेंटर पानटपरी हे जवळपास गेल्या तीस वर्षांपासून नियमितपणे शुरु होत्या व सदर दुकाने नियमितपणे नगरपरिषदेला कर ही देत होते
शहरात नवीन बस स्थानक निर्माण केले गेले व लॉयड्स मेटल्स कंपनीने विस्तारीकरण करून नवीन प्रवेशद्वार निर्माण केल्याने सदर दुकाने हे अडथळा निर्माण करीत असल्याने शहराच्या विकासा करिता नगरपरिषद मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार यांनी अतिक्रमण धारकांना तीन नोटीस देऊन दिनांक 28 में रोजी पोलीस प्रशासन,दंगा पथक,बुलडोजर,जेसीबी,व नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेवून सकाळी आठ वाजता पासून अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली
याप्रसंगी काँग्रेस शहर अध्यक्ष राजुरेड्डी,किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे,काँग्रेस नेते पवन आगदारी, काँग्रेस नेते सैय्यद अनवर,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार अध्यक्ष दिलीप पिटटलवार,काँग्रेस नेते अलीम शेख,काँग्रेस नेते हेमंत उरकुडे,शिवसेना नेते सुधाकर बांदूरकर,गणेश शेंडे,राष्ट्रवादी युवा नेते शरद कुम्मरवार,काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष रोशन दंतालवार,रोहित डाकूर,विशाल मादर,इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख,दिपक पेंदोर,कुमार रुद्रारप,सुनील पाटील ,कपील गोगला व मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी गादेवार याला घेराव घालून शहरातील सर्वात मोठा अतिक्रमण सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्र असून त्याला अतिक्रमण कारवाईत का सूट देण्यात आली,भारतीय जनता पक्षाच्या होर्डिंग्ज का काढण्यात आले नाही म्हणून बुलडोजर समोर सर्व नेते आडवे आले यामुळे वातावरण काही वेळेसाठी
तणावग्रस्त झाला सदर नेत्यांवर अटकेची कारवाई करण्याचा इशारा गादेवार यांनी दिला मात्र सदर नेते अटके करिता तैयार असल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याने नगरपरिषदेने भाजपचा एक होर्डिंग्ज पाडला व नंतर परत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार जनसंपर्क कार्यालय पाडण्यास महाविकास आघाडीचे नेते व नगरपरिषद कर्मचारी पोलीस प्रशासनात वाद झाला मात्र शासकीय लवाजमा घेवून आलेल्या नगरपरिषदेने अतिक्रमणाची कारवाई पार पाडली एकतर्फी कारवाईचे हे प्रकरण येणाऱ्या दिवसात पेट घेईल अशी शक्यता दिसत आहे