घुग्घुस पोलीस स्टेशन तर्फे जाहीर अव्हान
घुग्घुस:
पोलीस ठाणे घुग्घूस हद्दीतील सुजाण नागरिकांना याद्वारे पोलीस ठाणे वतीने जाहीर आवाहन करण्यात येते की,लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने दिनांक 16/03/2024 पासून ते दिनांक 06/06/2024 रोजी पावेतो आदर्श आचार संहिता अंमलात असून संपूर्ण देशभरात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा निकाल दि.04/06/2024 रोजी जाहीर होणार असून त्या अनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, कोणीही नागरिक सदर निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियाद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप ग्रुप व इतर तत्सम एप्लीकेशनच्या माध्यमाद्वारे कोणत्याही समाजाच्या, जातीच्या, धर्माच्या भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या पोस्ट कॉमेंट्स स्टोरी स्टेटस डिजिटल बॅनर असे प्रकार वरील माध्यमाद्वारे करू नयेत. तसेच कोणाचेही विरोधात घोषणाबाजी करू नये, डीजे वाजवणार नाहीत, फटाके फोडणार नाहीत तसेच विनापरवाना विजयी मिरवणूक काढू नये. व्हाट्सअप ग्रुपचे एडमिन यांनी दिनांक 03/06/2024 ते दिनांक 06/06/2024 या कालावधीमध्ये त्यांच्या ग्रुपच्या सेटिंग मध्ये ONLY ADMIN करून बदल करून घ्यावा जेणेकरून ग्रुप मधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुप वर टाकणार नाहीत जर ऍडमिन यांनी सेटिंग मध्ये बदल केला नाही व कोणी सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह ग्रुप एडमिन ला जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.सदर माहीती संपुर्ण महाराष्ट्रात पोलीस विभाग कडुन देण्यात आली.