भाजपा घुग्घुसतर्फे नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याचा जल्लोष
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे नाव विश्वात गौरवीत केले- विवेक बोढे
घुग्घुस : येथील भाजपातर्फे रविवार, ९ जुन रोजी सायंकाळी शहरात नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याचा जल्लोष साजरा करण्यात आला. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला एनडीएसह घवघवीत यश प्राप्त झाले.
राष्ट्रपती भवनात सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. देशात नवीन एनडीए सरकारची स्थापना झाली.
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेताच ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रासमोर फटाके फोडण्यात आले तसेच मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणि गांधी चौकात फटाक्यांची आतिषबाजी करीत कार्यकर्त्यांना लाडू वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आला.
याप्रसंगी बोलतांना भाजपा महामंत्री विवेक बोढे म्हणाले, आज प्रत्येक भारतीयांच्या जीवनातील आनंदाचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे, एनडीएचे नवीन सरकार स्थापन करण्यात आले आहे. मागच्या दोन कार्यकाळात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी मोठे मोठे निर्णय घेतले आणि देशाचे नाव विश्वात गौरवित केले. येणाऱ्या पाच वर्षात ते भारताला नवीन उंचीच्या शिखरावर घेऊन जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मोठे व्हिजन आहे. त्यामुळे भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होणार.
यावेळी भाजपाच्या नितु चौधरी, किरण बांदूरकर, सिनू इसारप, संतोष नुने, विनोद चौधरी, अमोल थेरे, राजकुमार गोडसेलवार, राजेश मोरपाका, चिन्नाजी नलभोगा सतीश बोन्डे, किरण बोढे, सुचिता लुटे, वैशाली ढवस, पूजा दुर्गम, सुनील बाम, गणेश कुटेमाटे, दिनेश बांगडे, विवेक तिवारी, विनोद जंजर्ला, विजय आगरे, विनोद खेवले, प्रवीण सोदारी, सुरेंद्र भोंगळे, सुरेंद्र जोगी, विशाल नागपुरे आदींची उपस्थिती होती.