घुग्घुसचे ज्येष्ठ नेते चिन्नाजी नलभोगा यांची जिल्हा शांतता कमेटीत निवड
घुग्घुस : येथील भाजपाचे जेष्ठ नेते चिन्नाजी नलभोगा यांची जिल्हा शांतता कमेटीत नुकतीच निवड झाली आहे. राजकीय क्षेत्रात चिन्नाजी नलभोगा यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
घुग्घुस ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पं. स. सदस्य ते जि. प. सदस्य असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. अतिशय मेहनती कार्यकर्ते अशी चिन्नाजींची अगोदर पासून ओळख आहे. जनसामान्यांच्या हाकेला धावून जाणारा नेता अशी त्यांची घुग्घुस शहरात प्रचिती आहे. त्यांच्या राजकीय जीवनात शहरात नेहमी सौहार्द स्थापन व्हावे यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. अगोदर पासून जनतेमध्ये चिन्नाजी अतिशय लोकप्रिय आहे.
जिल्हा शांतता कमेटीत चिन्नाजी नलभोगा यांची वर्णी लागल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.