संघर्षाचे दूसरे नाव गीत घोष: – उत्तम गेडाम वणी दी.

24

संघर्षाचे दूसरे नाव गीत घोष: – उत्तम गेडाम
वणी दी.

वणी:
“गीत घोष यांचे आयुष्य संघर्षाचे असून, शोषित, पिडीत, आदिवासी, सर्वहारा माणसांचा भविष्यकाळ उज्ज्वल करण्यासाठी वर्तमान काळातील सुखाचा व गरजांचा त्याग करून ते आदिवासींच्या हक्कांसाठी बौद्धिक व आंदोलनात्मक भुमिका घेऊन लढत आहेत. त्यामुळे त्यांचे संपूर्ण जीवन संघर्षमय असून संघर्षाचे दूसरे नाव गीत घोष आहे.” असे मत गीत घोष यांच्या पृथ्वी अवतरण (वाढदिवसाच्या) निमित्ताने अ.भा.संवैधानिक हक्क परिषद, आदिवासी सोशल फोरम, वणी च्या वतीने आयोजित जन्मदिवस सोहळ्यात अध्यक्ष या नात्याने मा. उत्तमराव गेडाम आपले विचार व्यक्त करीत होते.

वणी येथील विश्राम गृहात सामाजिक योध्दा गीत घोष यांच्या पृथ्वी अवतरण (वाढदिवसाच्या) निमित्ताने त्यांचा जन्म दिवस साजरा करण्याचा कार्यक्रम अ.भा.संवैधानिक हक्क परिषद, आदिवासी सोशल फोरम, वणी च्या पुढाकारात हा कार्यक्रम दि.२४ जून २०२४ ला आयोजित केला होता.

या वाढदिवस सोहाळ्याचे अध्यक्ष माजी शिक्षणाधिकारी तथा कवि व साहित्यिक मा.उत्तमरावजी गेडाम हे होते, प्रमुख अतिथी म्हणून अ.भा.महिला संवैधानिक हक्क परिषदेच्या राज्याध्यक्ष मा. मनिषाताई तिरणकर, यवतमाळ, सामाजिक कार्यकर्त्या मा बेबीताई मेश्राम, वणी, आदिवासी सोशल फोरमचे अध्यक्ष मा.रमेश मडावी हे होते. तसेच मा. भाऊरावजी आत्राम,सौ. मंथनाताई सुरपाम, महेश आत्राम,चेतन सुरपाम हे उपस्थित होते. पुढे बोलताना गेडाम सर म्हणाले की, “गीत घोष हे आपल्या आयुष्याचा त्याग करून कण आणि कण, ज्ञान आणि संघर्ष समाजासाठी समर्पित करत आहेत.” असे गौरवोद्गार त्यांनी काढले, प्रमुख अतिथीनी बोलताना आज जी ओळख आहे ती गीत घोष साहेबांच्या मार्गदर्शन आणि पुढारपणामुळेच निर्माण झाली आहे,असे मत व्यक्त केले. सर्वांनी त्यांना शत आयुषी होण्याच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन मा.संतोष चांदेकर यांनी केले तर आभार मा.कृष्णाजी मडावी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here