- चुडाराम बल्हारपुरे यांच्या “गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके” या नाटकास झाडीबोली साहित्य मंडळाचा पुरस्कार जाहीर
———————————————
गडचिरोली –
झाडीबोली साहित्य मंडळ , शाखा गडचिरोली या संस्थेतर्फे दरवर्षी झाडीपट्टीतील तीन साहित्यिकांना उत्कृष्ट पुस्तक निर्मीतीसाठी व एक कलावंतास त्याच्या उत्कृष्ट कलानिर्मितीसाठी पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना झाडीबोली साहित्य मंडळाच्या वार्षिक संमेलनात साहित्य प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
झाडीपट्टीत अत्यंत मानाचा समजला जाणाऱ्या या पुरस्काराकरीता नाट्यवांड्.मय प्रकारात झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या “गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके” या नाटकास नाट्यलेखनाचे पारितोषिक जाहीर करण्यात आल्याचे झाडीबोली साहित्य मंडळ, शाखा गडचिरोली अध्यक्ष तसेच पुरस्कार समिती प्रमुख डॉ . चंद्रकांत लेनगुरे यांनी कळविले असून दि. ७ जूलै ला बळीराजा पॅलेस, चामोर्शी रोड, गडचिरोली येथे होणाऱ्या झाडीबोली साहित्य मंडळाच्या वार्षिक कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मान वस्त्र, व सन्मानपत्र असे आहे. विशेष म्हणजे या नाटकास यापूर्वी कंथेवाडी , ता. राधानगरी जि. कोल्हापूर येथील *’गगनगिरी महाराज साहित्य गौरव पुरस्कार – २०२३* ‘, मौजा फलटण (जिल्हा- सातारा येथील *धर्मविर संभाजी महाराज उत्कृष्ट साहित्य पुरस्कार- २०२४ व तितिक्षा इंटरनॅशनल, पुणे यांचे तितिक्षा उत्कृष्ट वांड्.मय पुरस्कार- २०२४* प्राप्त झाले आहे . या नाटकाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयोग सुरू असून नुकत्याच भोपाळ (मध्यप्रदेश) येथे झालेल्या जनयोद्धा राष्ट्रीय समारोहात या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला आहे.
चुडाराम बल्हारपुरे हे झाडीपट्टीतील राज्य पुरस्कार प्राप्त नाटककार आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वांड्.मय पुरस्कार प्राप्त झालेले आहे. आजपर्यंत त्यांची विविध १३ पुस्तके प्रकाशित झाली असून विविध स्तरावरील अनेक पुरस्काराने ते सन्मानीत आहेत. महामृत्युंजय मार्कंडेश्वर, महापूजा, बहूढंगी समाधीवाले बाबा, स्पेशल रिपोर्ट, धरती आबा-क्रांतीसुर्य बिरसा मुंडा ,व गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबूराव शेडमाके ही त्यांची गाजलेली नाटके आहेत.
चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल प्रा. अरुण बुरे, योगेश गोहणे, यादव गव्हाणे, प्रा. डॉ. श्याम मोहरकर, प्रा. डॉ. जनबंधू मेश्राम, प्रा. डॉ. योगीराज नगराळे, नाट्यश्रीच दादा चुधरी, दिलीप मेश्राम, राजेंद्र जरुरकर, दै. लोकमतचे संजय तिपाले, दै. हितवादचे रोहिदास राऊत, दै. देशोन्नतीचे नरेश बावणे, दै. सकाळचे मिलिंद उमरे, दै. पुण्यनगरीचे प्रल्हाद म्हशाखेत्री व प्रमोद गेडेकर, प्रा. नवनीत देशमुख (साहित्यिक), मधुश्री प्रकाशनचे पराग लोणकर (प्रकाशक) , व इतर साहित्यिक व कलावंतांनी अभिनंदन केले आहे.