शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेचा लाभ घ्यावा- विवेक बोढे
घुग्घुस परिसरातील शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनातर्फे एक रुपयात पीक विमा योजना सुरु करण्यात आली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतर्गत यंदाच्या खरीप हंगामात एक रुपयात ४७ हजार ७५० रुपये प्रतिहेक्टर पीकविमा संरक्षण मिळणार आहे.
पीकविमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात शेतकऱ्यांना मोफत ऑनलाईन पीकविमा करून देण्यात येत आहे.
यावेळी भाजपाचे गणेश कुटेमाटे, शेतकरी प्रदीप जोगी, मिलिंद पानघाटे उपस्थित होते.