घुग्घूस नगरपरिषद बेवारस काँग्रेसचे मुख्याधिकाऱ्याच्या रिकाम्या खुर्चीला निवेदन देऊन निषेध

64

घुग्घूस नगरपरिषद बेवारस काँग्रेसचे मुख्याधिकाऱ्याच्या रिकाम्या खुर्चीला निवेदन देऊन निषेध

घुग्घुस : चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शहरातील नगरपरिषद ही पूर्णपणे बेवारस स्तिथीत आलेली असून शहरात नागरिकांच्या, विद्यार्थ्यांच्या समस्या निकाली काढण्यासाठी नगरपरिषदेत कुणी ही जवाबदार व्यक्तीच नाही

आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास घुग्घूस शहरात काँग्रेस कमेटीचे शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ शास्त्री नगर व आंबेडकर नगर येथील रस्त्यावरील खड्डा,एक महिन्यापासून बंद असलेले पथदिवे, आठवड्या भरापासून येत नसलेले घंटा गाडया व अन्य समस्येचे निवेदन घेऊन गेले असता याठिकाणी निवेदन घेणारा कुणी ही अधिकारी उपस्थित नसल्याने संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी यांच्या रिकाम्या खुर्चीलाच निवेदन देत जाहीर निषेध व्यक्त केला

याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार अध्यक्ष दिलीप पिट्टलवार,अलीम शेख, एन. एस. यु. आय अध्यक्ष आकाश चिलका,रोशन दंतलवार सोशल मीडिया अध्यक्ष,विशाल मादर,अविनाश गोगुर्ले, देव भंडारी, सुनील पाटील,अनिल मादर,सूरज लभाने, अनोक तालापेल्ली, शुभम शेंडे, किरण येलकापेल्ली, प्रतीक रामिलला, प्रणय भ्ररे, व अन्य काँग्रेस पदाधिकारी व नागरिकगण उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here