कृषी दिन व वसंतराव नाईक जयंती व वन महोत्सवानिमित्त TDRF द्वारा ” एक -जवान ” एक वृक्ष” या उपक्रमाद्वारे तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण*

33

 

कृषी दिन व वसंतराव नाईक जयंती व वन महोत्सवानिमित्त TDRF द्वारा ” एक -जवान ” एक वृक्ष” या उपक्रमाद्वारे तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण*

कृषी आणि निसर्ग, शेतकरी आणि वृक्ष दोघांचेही संगोपन म्हणजे राष्ट्रोन्नती*

-TDRF संचालक हरिश्चंद्र ब. राठोड

घुगुस : –
दरवर्षीप्रमाणे दि. १ जुलै रोजी कृषी दिन व हरित क्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त TDRF द्वारा “एक जवान,एक वृक्ष” हा उपक्रम राबवून विदर्भातील वेगवेगळ्या कंपनीतील (तालुक्यांमधील) सर्व TDRF अधिकारी व जवान यांनी आपल्या घराच्या अंगणात तसेच आजूबाजूच्या परिसरात सोबतच मोकळ्या जागेत व ज्या ठिकाणी झाड नाही अशा विविध उपयोगी वृक्ष लावून त्याच्या संगोपनाची जबाबदारी घेऊन त्यांची निगा राखण्याचे संकल्प घेतले.
*TDRF द्वारा वृक्ष लागवडीचा प्रण*
TDRF संचालक हरिश्चंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनात सर्व TDRF अधिकारी आणि जवानांनी १ जुलै २०२४ ते ५ मार्च २०२५ पर्यंत वृक्षरोपण करून त्यांचे संगोपन करण्याचा प्रण घेतला आहे. या कालावधीत TDRF द्वारा विविध ठिकाणी झाडे लावण्यात येईल व नागरिकांमध्ये पर्यावरण संबंधित जनजागृती करून झाडे लावण्यास इच्छुक नागरिकांना झाडांचे वाटप करून त्यांच्या हस्ते झाडे लाऊन त्यांचे संगोपन करण्यात येईल.

या उपक्रमाच्या माध्यमातून घुगुस तालुक्यातील TDRF जवानांनी TDRF संस्थापक तथा संचालक हरिश्चंद्र राठोड यांच्या नेतृत्वात मार्गदर्शनात शिवाजी पार्क शिवमंदिर तसेच घुगुस चंद्रपूर तहसील च्या वेगवेगळ्या भागात विविध ठिकाणी नीम पीपल सीताफळ जाम गुलमोहर जामून सिंदूर इ. उपयोगी वृक्षांची लागवड केली. या उपक्रमाच्या प्रकल्प अधिकारी म्हणून TDRF जनसंपर्क अधिकारी अभिषेक राजहंस व TDRF मुख्य क्षेत्रीय अधिकारी मुस्कान सय्यद कार्यरत होते. सोबतच घुगुस मधील प्रथा कैथल, निलम वर्मा, नेहा वर्मा,कोमल सूर्तेकर, आचाल आस्वले, खुशबू पुरडकर. इ. जवानांनी विशेष कार्य करावे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here