वादग्रस्त सेवानिवृत्त :- पोलीस निरीक्षक सुधाकर आंबोरेचा काँग्रेस पक्ष प्रवेश
चंद्रपूर विधानसभेतुन उमेदवारी करीताच पक्ष प्रवेश?
घुग्घुस- :चंद्रपूर : विधानसभेच्या निवडणुक जवळ येत असल्याने राजकीय पक्षात इन्कमिंग व आऊटगोइंगला सुरुवात झालेली आहे
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात जास्त वादग्रस्त असलेल्या माजी पोलीस निरीक्षक सुधाकर आंबोरे यांचा पक्ष प्रवेश सोहळा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते पार पडला व सदर पक्षप्रवेश कार्यक्रम प्रसंगी खासदार प्रतिभा धानोरकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष व राजुरा विधानसभा आमदार सुभाष धोटे यांच्या उपस्थित झाल्याने आंबोरे यांना चंद्रपूर विधानसभे करीता आमदारकीची तिकीट देण्यात येईल असे चित्र सध्या तरी दिसत आहे .
मात्र शेवटी काँग्रेस पक्षात शेवटच्या क्षणी कुणाला तिकीट मिळते आणि कुणाचं तिकीट कटतो हा येणारा काळच सांगेल?
आंबोरे यांचा वादग्रस्त प्रवास..
आंबोरे हे घुग्घुस पोलीस स्टेशनचे पदाधिकारी असतांना त्यांची पत्रकारा सोबत झालेली फ्री स्टाईल, पडोली येथील व्यापाऱ्यांला करण्यात आलेली मारहाण ही खूपच गाजली होती आणि सेवानिवृत्तीच्या काही दिवस अगोदर ब्रम्हपुरी येथे ट्रॅव्हल्स चालकाला केलेली मारहाण व त्याप्रसंगी वापरण्यात आलेले वाहन हे वणी येथील सट्टा किंगचे असल्याने पोलीस दलाची प्रतिमा जन्मानसात दागळली ते प्रकरण अजून ही नागरिकांच्या लक्षात असताना एका प्रचंड वादग्रस्त व्यक्तीला काँग्रेस मध्ये मिळालेल्या प्रवेशाने चर्चेला पेव फुटला आहे.
वेळेवर पक्षात येऊन आमदारकी मिळवून जातो की काय? म्हणून आमदारकी करीता बाशिंग बांधलेल्या कार्यकर्त्यांचा या पक्ष प्रवेशाने हिरमूस झालेला आहे .