दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या गुन्हेगारांची टोळी जेरबंद

63

दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या गुन्हेगारांची टोळी जेरबंद

शिरपूर पोलिसांची कारवाई

शिरपुर पोलीस स्टेशन येथे मंगळवार, १६ जुलै रोजी परीसरात मोहरम सन उत्सव संबंधाने सपोनि माधव शिंदे ठाणेदार शिरपुर यांचे आदेशान्वये पेट्रोलिंग करीत असतांना ठाणेदार माधव शिंदे यांना गुप्त माहीती मिळाली की, चिंचोली परीसरात मध्ये ६ ते ७ इसम चिंचोली फाटा परीसरात दरोडा घालण्यासाठी दबा धरुन बसुन आहे.
अशा खात्रीलायक माहीतीवरुन त्यांनी पो.स्टे. चे पोउपनि रावसाहेब बुधवत व पोलीस पथकाला वरील कारवाई कामी आदेशित केल्याने त्यांनी रात्री १ वाजताच्या सुमारास जावुन घटनास्थळाच्या ठिकाणी घेराव घालुन आरोपी यांना ताब्यात घेउन त्याची सदर ठिकाणी पडताळणी करुन आरोपी अनिल कल्लु निशाद वय २७ वर्षे, सुनिल कल्लु निशाद वय ३० वर्षे दोन्ही रा. रामनगर, सास्ती ता. राजुरा जि. चंद्रपुर, निलेश मनोहर बावणे वय २५ वर्षे रा. मुंगोली ता. वणी जि. यवतमाळ, एक विधीसंघर्ष बालक, फरार आरोपी बंडल निषाद वय २८ वर्षे रा. रामनगर, सास्ती ता. राजुरा जि. चंद्रपुर, प्रफुल चौधरी वय २५ वर्षे रा. घुग्घुस ता.जि. चंद्रपुर, संकेत भोजेकर वय २१ वर्षे रा. एकोडी ता. कोरपणा जि. चंद्रपुर.
हे दरोडा घालण्यासाठी एकत्रित येउन दरोडा घालण्याची पुर्वतयारी करतांना मिळुन आले आरोपीकडुन दरोडा साहित्य लोखंडी रॉड, आरी पत्ता, पेन्चिंस, पेचकस ईतर कि. ४२,१७० रु व गुन्ह्यात वापरलेली एक पांढ-या रंगाची इंन्डीगो मांझा कंपनीचे चारचाकी वाहन क्रमांक एमएच ०९ बि.एम.०१३३ कि. २, ००, ००० रु असा एकुण २, ४२, १७० रु चा मुद्देमाल आरोपीक़डुन घटनास्थळ जप्ती पंचनामा प्रमाणे जप्त करुन त्यांचेवर कलम ३१० (४), ३१० (५) भारतीय न्याय संहीता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन तपास सुरु केला.
गुन्ह्याच्या तपासात फरार आरोपी संतोष उर्फ बंडल शिवप्रसाद निषाद वय २८ वर्षे रा. रामनगर, सास्ती ता. राजुरा जि. चंद्रपुर, प्रफुल महादेव चौधरी वय २५ वर्षे रा. घुग्घुस ता.जि. चंद्रपुर, संकेत विलास भोजेकर वय २१ वर्षे रा. एकोडी ता. कोरपणा जि. चंद्रपुर यांना तत्काळ अटक करुन वरील सर्व ७ आरोपीना न्यायालयात हजर करण्यात आले.
ही कारवाई डॉ. पवन बन्सोड पोलीस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ, गणेश किंन्द्रे उपविभागीय पोलीस अधिकारी वणी, रामेश्वर बैंजणे पांढरकवडा पोलीस निरीक्षक, ज्ञानोबा देवकते स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पो. स्टे. शिरपुरचे सपोनि माधव शिंदे ठाणेदार शिरपुर, पोउपनि रावसाहेब बुधवत, पोहेकॉ सुनिल दुबे, पोहवा गंगाधर घोडाम, पोहवा प्रशांत झोड, नापोकॉ निलेश भुसे, नापोकॉ गजानन सावसाकडे पोकॉ अमित पाटील, पोकॉ विनोद मोतेराव, चालक पोकॉ विजय फुल्लुके यांनी पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here